शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

Maharashtra election 2019 ; काँग्रेस-सेनेच्या लढतीत आप व वंचितमुळे रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 06:00 IST

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या गणिताबरोबरच अन्य जातीय समीकरणही जुळविले जात आहे. तर आजवर झालेल्या निवडणुकांवर दृष्टीक्षेप टाकल्यास अपवाद वगळता भाजपने शिवसेनेच्या व शिवसनेने भाजपच्या उमेदवाराला किती साथ दिली याबाबत या पक्षात कधीही एकमत जाणवले नाही. श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी या आपचा झाडू हातात घेऊन मैदानात आहेत.

ठळक मुद्देब्रह्मपुरी विधानसभा : जुळवले जाताहेत जातीय समीकरणाचेही गणित

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघात काँग्रेस व शिवसेना यांच्यातील लढतीत वंचित बहुजन आघाडीमुळे चुरस तर आपमुळे या निवडणुकीला नवा रंग चढला आहे. उमेदवारांकडून जातीय समीकरणेही मांडले जात आहे. एकूणच घडामोडी बघता या मतदार संघाची निवडणूक रंजक बनत चालली आहे.ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघात ११ उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. यामध्ये काँग्रेसचे हेवीवेट नेते विजय वडेट्टीवार, शिवसेनेचे संदीप गड्डमवार, आम आदमी पार्टीच्या अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी व अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माजी न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेत रंगणाऱ्या सामन्यात आप आणि वंचित बहुजन आघाडीने प्रचारात गती वाढविल्याने निवडणुकीची चुरसही वाढताना दिसत आहे. काँग्रेसने वडेट्टीवार यांना रिंगणात उतरविल्यामुळे त्यांच्या विरोधात कोण राहील, याकडे जनतेचे लक्ष लागले होते. ऐनवेळी शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवार आयात करून बाजी लावली. गड्डमवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. परंतु मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ राहून इमाने-इतबारे काम करणाºया कार्यकर्त्यांची चांगलीच गोची झाली आहे. नेत्याने पक्षांतर केल्याने कोणता झेंडा हाती घ्यावा, अशी द्विधामनस्थिती अपवाद वगळता काही कार्यकर्त्यांची झाली आहे. काहींना नाईलाजास्तव शिवसेनेचा भगवा झेंडा हातात घ्यावा लागला असल्याचे समजते. ही बाब हेरून वंचित बहुजन आघाडीनेही नवे डावपेच आखणे सुरू केले आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या गणिताबरोबरच अन्य जातीय समीकरणही जुळविले जात आहे. तर आजवर झालेल्या निवडणुकांवर दृष्टीक्षेप टाकल्यास अपवाद वगळता भाजपने शिवसेनेच्या व शिवसनेने भाजपच्या उमेदवाराला किती साथ दिली याबाबत या पक्षात कधीही एकमत जाणवले नाही. श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी या आपचा झाडू हातात घेऊन मैदानात आहेत. त्यांचा प्रचार वेगळा वाटत असला तरी त्या राजकीय क्षेत्रात किती प्रभाव पाडतात, हे बघण्यासारखे आहे. काँग्रेस आणि शिवसेना या प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात चांगलीच गती घेतली असून वंचित आणि आपने लढतीत नवा रंग भरल्यामुळे ही निवडणूक रंगतदार होईल, असे चित्र आहे. 

टॅग्स :bramhapuri-acब्रह्मपुरी