शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; जिल्ह्यात वडेट्टीवारांसह काँग्रेसही जिंकली; तर दुसरीकडे भाजप हरली, मुनगंटीवार व भांगडिया मात्र जिंकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 06:00 IST

चंद्रपूरात अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी तब्बल ७२,१०७ इतक्या विक्रमी मताधिक्याने विजय संपादन केला. आता चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस-३, भाजप-२ व अपक्ष -१ असे पक्षीय बलाबल झाले आहेत. एकूणच निकालावरून भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार हे जिंकले, भाजप मात्र हरली, दुसरीकडे वडेट्टीवारांसह काँग्रेस जिंकल्याचा सूर होता.

ठळक मुद्देचंद्रपूरात जोरगेवारांची लक्षवेधक विजयी मिरवणूकसुधीर मुनगंटीवार सहाव्यांदा विजयी तर वडेट्टीवारांचा पाचव्यांदा विजयराजुरा व वरोऱ्यात काट्याची टक्कर, काँग्रेस विजयीचिमूरात युवा व मातृशक्तीचा विजय

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील सहाही मतदार संघात चुरशीच्या लढती झाल्या. भाजपने बल्लारपूर व चिमूर या दोन विधानसभा मतदार संघात विजय संपादन केला तर काँग्रेसने ब्रह्मपुरी, राजुरा आणि वरोरा विधानसभा मतदार संघात विजय मिळविण्यात यश मिळविले. चंद्रपूरात अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी तब्बल ७२,१०७ इतक्या विक्रमी मताधिक्याने विजय संपादन केला. आता चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस-३, भाजप-२ व अपक्ष -१ असे पक्षीय बलाबल झाले आहेत. एकूणच निकालावरून भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार हे जिंकले, भाजप मात्र हरली, दुसरीकडे वडेट्टीवारांसह काँग्रेस जिंकल्याचा सूर होता.चंद्रपूर मतदार संघात अपक्ष किशोर जोरगेवार व भाजपचे नाना श्यामकुळेंमध्ये झालेल्या एकतर्फी लढतीत जोरगेवार विक्रमी मताधिक्याने विजयी झाले. काँग्रेसचे महेश मेंढे हे चवथ्या क्रमांकावर फेकल्या गेले. वंचितचे अनिरुद्ध वनकर यांनी १५,११७ मते घेत तिसºया स्थानावर झेप घेतली.बल्लारपूरात भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार व काँग्रेसचे डॉ. विश्वास झाडे यांच्यात झालेल्या लढतीत मुनगंटीवार यांनी ३२,८५८ मताधिक्याने विजय संपादन केला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजू झोडे यांना ३९,३८२ मते घेत तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. राजुरा विधानसभा मतदार संघात अतिशय अटीतटीत झालेल्या चौरंगी लढतीत कॉग्रेसचे सुभाष धोटे अवघ्या २,५०९ मतांनी विजयी झाले. सुरुवातीला स्वभापचे अ‍ॅड. वामनराव चटप हे आघाडीवर होते. मात्र अखेरच्या फेऱ्यांमध्ये धोटेंनी चुरशीच्या लढतीत विजयावर शिक्कामोर्तब केले. भाजपचे विद्यमान आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांना ५०,९०० मते घेत तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले. तर गोंडवाना गणतंत्र पार्टीचे गोदरू जुमनाके यांनी तब्बल ४३,१४५ मतांपर्यंत अनपेक्षित मजल मारली. ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे दिग्गज नेते विजय वडेट्टीवार व शिवसेनेचे संदीप गड्डमवार यांच्यात थेट लढत झाली. सुरुवातीपासूनच वडेट्टीवार हे आघाडीवर होते. अखेरच्या टप्प्यात १८,५३८ इतक्या मताधिक्याने वडेट्टीवारांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. चिमूर विधानसभा मतदार संघात भाजपचे आमदार किर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया व काँग्रेसचे डॉ. सतीश वारजुकर यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत भांगडिया दुसºयांदा विजयी झाले. भाजप बंडखोर धनराज मुंगले हे ११,१६२ मते घेत चवथ्या क्रमांकावर स्थिरावले. वंचित बहुजन आघाडीचे अरविंद सांदेकर हे तिसऱ्या क्रमांकावर होते. वरोरा मतदार संघात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर व माजी मंत्री शिवसेनेचे संजय देवतळे यांच्यात झालेल्या काट्याच्या लढतीत धानोरकर या १० हजार ३६१ मतांनी विजयी नोंदवत जिल्ह्यातील एकमेव महिला आमदार ठरल्या.सहाही मतदार संघात ताणली होती उत्सुकतामतमोजणी सुरूवात झाल्यापासूनच सहाही मतदार संघाच्या लढतीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागून होते. चंद्रपूर विधानसभा मतदार संघाच्या लढतीकडे चंद्रपूरसह जिल्ह्यातीलच नव्हे, विदर्भातील जिल्ह्यांचेही लक्ष लागले होते.चिमूर विधानसभा मतदार संघात सुरुवातीला काँग्रेसचे डॉ. सतीश वारजुकर आणि भाजपचे कीर्तीकुमार भांगडिया यांच्यात चुरशीची आणि काट्याची लढत बघायला मिळाली. काही फेऱ्यांमध्ये सतीश वारजुकर आघाडीवर होते. नंतर भांगडिया यांनी घेतलेली आघाडी अखेरपर्यंत वाढवित नेली.राजुऱ्याने वेधले अचानक लक्षराजुरा विधानसभा मतदार संघात सुरुवातीपासून स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार अ‍ॅड. वामनराव चटप आघाडीवर होते. त्यांनी पाच हजारांपर्यंत आघाडी घेतल्यामुळे त्यांचा विजय पक्का मानला जात होता. मात्र अखेरच्या फेऱ्यांमध्ये अ‍ॅड. चटप माघारत गेले आणि काँग्रेसचे सुभाष धोटे यांनी बरोबरी करीत आघाडी घेतली. अखेरच्या फेरीपर्यंत उत्सुकता शिगेला पोहचली होती. अखेर सुभाष धोटे यांनीच विजयावर शिक्कामोर्तब केल्याने अ‍ॅड. वामनराव चटप यांना अखेरच्या टप्प्यात विजयापासून दूर जावे लागले.वरोऱ्यात देवतळेंचा धक्कादायक पराभववरोरा विधानसभा मतदार संघात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर व शिवसेनेचे संजय देवतळे यांच्यात चुरशीचा सामना रंगला. सुरुवातीपासूनच संजय देवतळे तर कधी प्रतिभा धानोरकर एकमेकांची आघाडी कमी करीत होते. यामध्ये संजय देवतळे विजयावर शिक्कामोर्तब करतील, असे चित्र वर्तविले जात असताना अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये प्रतिभा धानोरकर यांनी आघाडी घेतली. ही आघाडी वाढतच जावून त्यांनी विजय संपादन केला. तर संजय देवतळे यांना पराभवाचा सामना करावा लागला. देवतळे सहज विजयाची अपेक्षा बाळगून होते.या निकालांची ठळक वैशिष्ट्ये काय?जनतेनी पक्षापेक्षा उमेदवाराकडे पाहुन मतदार केल्याचे एकूणच निकालावरून लक्षात येणारे आहेत.मतदानातून जनतेला विकासकामे अपेक्षित आहे हे पुन्हा एकवार जनतेनी दाखवून दिलेले आहेत. निष्क्रिय चेहरे जनतेला रुचले नाही.सुधीर मुनगंटीवार व कीर्तीकुमार भांगडिया यांनी केलेल्या विकासकामांमुळेच जनतेनी त्यांच्यावरील विश्वास कायम ठेवला.पराभवाची हॅट्ट्रिकअ‍ॅड. वामनराव चटप हे २००९ व २०१४ तसेच आता ही अशा तीन निवडणूका हरलेत. संजय देवतळे हे २०१४ लोकसभा, विधानसभा व आता विधानसभा अशा तीन निवडणूका हरले. तसेच संदीप गड्डमवार हेसुद्धा पहिल्यांदा अपक्ष नंतर राकाँच्या तिकीटावर आता शिवसेनेच्या तिकिटावर हरले.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर