शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : बल्लारपूर विधानसभा क्षेत्र शंभर टक्के आरोयुक्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 05:01 IST

मुनगंटीवार पुढे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय आपण नागरिकांच्या सेवेत रूजु केले. टाटा ट्रस्टच्या मदतीने लवकरच कॅन्सर हॉस्पीटल चंद्रपुरात उभारयात येणार आहे. नक्षलग्रस्त व आदिवासी भागातील हे पहिले कॅन्सर हॉस्पीटल ठरणार आहे. रोजगार व स्वयंरोजगाराच्या दृष्टीने पोंभुर्णा येथे टूथपिक उत्पादन केंद्र, बल्लारपूरात डायमंड कटींग व प्रशिक्षण केंद्र, मधुमक्षिका पालनाचा कृषी उद्योग, अगरबत्ती उत्पादन प्रकल्प, पोंभुर्णा येथे आदिवासी महिलांची पहिली कुक्कुटपालन कंपनी असे विविध उपक्रम आपण कार्यान्वीत केले आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : भटाळी येथील जाहीर सभेत केला संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येत्या काळात बल्लारपूर विधानसभा क्षेत्र शंभर टक्के आरोयुक्त करण्याचा आपला संकल्प असून नागरिकांच्या प्रेमाच्या आणि शुभेच्छांच्या बळावर हा संकल्प आपण निश्चितपणे पूर्ण करू, असा विश्वास बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.मुनगंटीवार पुढे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय आपण नागरिकांच्या सेवेत रूजु केले. टाटा ट्रस्टच्या मदतीने लवकरच कॅन्सर हॉस्पीटल चंद्रपुरात उभारयात येणार आहे. नक्षलग्रस्त व आदिवासी भागातील हे पहिले कॅन्सर हॉस्पीटल ठरणार आहे. रोजगार व स्वयंरोजगाराच्या दृष्टीने पोंभुर्णा येथे टूथपिक उत्पादन केंद्र, बल्लारपूरात डायमंड कटींग व प्रशिक्षण केंद्र, मधुमक्षिका पालनाचा कृषी उद्योग, अगरबत्ती उत्पादन प्रकल्प, पोंभुर्णा येथे आदिवासी महिलांची पहिली कुक्कुटपालन कंपनी असे विविध उपक्रम आपण कार्यान्वीत केले आहे.चंद्रपूर तालुक्यातील भटाळी येथे आयोजित जाहीर सभेत सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी भाजप नेते रामपाल सिंह, जिल्हा परिषद सदस्य रोशनी खान, वनिता आसुटकर, माजी जि.प. सदस्य विलास टेंभुर्णे, नामदेव आसुटकर, पंचायत समिती सदस्य संजय यादव, भाजप तालुकाध्यक्ष हनुमान काकडे, श्रीनिवास जनगम, सुभाष गौरकार आदींची उपस्थिती होती.ग्रामीण भागातील सिंचन व्यवस्थेला आपण नेहमीच अग्रक्रम दिला असून आसोलामेंढा सिंचन प्रकल्पाला गोसेखुर्दचे पाणी यामुळे जिल्ह्याला मिळाले आहे. जिल्ह्यात एक लाख ४५ हेक्टर सिंचन होत आहे. गोसेखुर्द प्रकल्पातून मिळणाऱ्या उजव्या कालव्याचा लाभ चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, सावली, चिमूर, मूल, पोंभुर्णा या तालुक्यातील शेतकऱ्यांना होत आहे, जिल्ह्यातील मामा तलावांना पुनरूज्जीवीत करण्यासाठी आपण पुढाकार घेतला. चिचडोह बॅरेज अंतर्गत चंद्र्रपूर जिल्ह्यातील २८ व गडचिरोली जिल्ह्यातील ४३ अशा एकूण ७१ गावांना पिण्याचे पाणी व ११ हजार ५१० हेक्टर सिंचन क्षेत्रास लाभ मिळणार आहे. पळसगाव-आमडी उपसा जलसिंचन योजनेतंर्गत पळसगाव, आमडी, आष्टी, कळमना, कोर्टीमक्ता, कोर्टी तुकूम, जोगापूर, लावारी, दुधोली, बामणी, केम या दहा गावांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या दहा गावातील एकूण दोन हजार ४६२ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे.बल्लारपूर तालुक्यातील शिवणी चोर सिंचन प्रकल्पाचे पुनरूज्जीवन, बल्लारपूर तालुक्यातील भिवकुंड नाल्याच्या पुनरूज्जीवनाचे काम प्रगतीपथावर, मूल तालुक्यातील चिचाळा व नजिकच्या सहा गावांना सिंचन सुविधा पुरविण्यासाठी २३ कोटी ४७ लक्ष ५४ हजार रू. निधी मंजूर केला. येत्या काळात हा जिल्हा पाणीदार करण्याचा आपला संकल्प असून तो नागरिकांच्या आशिर्वादाच्या बळावर निश्चितपण पूर्ण होईल, असेही सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले.यावेळी भटाळी येथील पहिल्या दहा मतदारांचा सत्कार करण्यात आला. जाहीर सभेला भटाळी येथील व परिसरातील नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर