शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र- तेलंगणला जोडणारा पूल धोकादायक

By admin | Updated: August 11, 2016 00:36 IST

महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांना जोडण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील वर्धा नदीवरील पोडसा गावालगत मोठा पूल बांधण्यात आला आहे.

तोहोगाव : महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांना जोडण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील वर्धा नदीवरील पोडसा गावालगत मोठा पूल बांधण्यात आला आहे. हा पूल सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याने या पुलावरुन होणारी वाहतूक बंद होण्याच्या मार्गावर आली आहे. हा पूल मध्येच वाकला असल्याने कोणत्याही क्षणी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे, अवघ्या चार वर्षापूर्वीच या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. मात्र अल्पावधीतच या पुलाचा एक पीलर पूर्णत: खाली दबल्याने पुल कोसळण्याची भीती असून कोणत्याही वेळी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागालादेखील याची भीत असल्याने त्यांनी या संदर्भात वरिष्ठांकडे तसा प्रस्ताव पाठविल्याची माहिती आहे. तरीही सध्या या पुलावरून वाहतूक अविरत सुरूच आहे.मुंबई-गोवा महामार्गावरील महाडजवळ झालेल्या दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील प्रमुख मार्गावरील पुलांचा आढावा घेतला असता, ही गंभीर बाब पुढे आली. चंद्रपूर जिल्ह्यातून जाणारा प्रमुख राज्य महामार्ग व प्रमुख जिल्हामार्ग अशा तीनही प्रकारच्या मार्गावर ५५१ मोठे पुल व ३१८७ लहान पुल आहेत. यातील बहुतांशी पुलाचे बांधकाम १९९५ नंतर करण्यात आल्याने सर्व पूल सुरक्षित व वाहतुकीस योग्य आहेत. काही ठिकाणी जुन्या पुलांऐवजी नवीन पूल बांधण्यात आले. या पुलांची वयोमर्यादा २५ ते ४० वर्षाची असल्याने कोणताही धोका नाही. परंतु, गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा गावालगतचा वर्धा नदीवरील हा पुल दबल्याने या महामार्गावरील वाहतुकीस धोका निर्माण झालेला आहे. ही नदी बारामाही वाहत असल्याने पाण्याचा प्रवाह मोठा असतो. सध्या पावसाळा सुरु असल्याने ही नदी दुधडी भरुन वाहत आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी मोठी दुघर्टना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पुलाच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ कडे आली. त्यानंतर या विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी स्वत: या पुलाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी करुन दुरुस्तीसंदर्भात वरिष्ठांकडे अहवाल सादर केला आहे. चार वर्षापूर्वी बांधकाम झालेल्या पोडसाजवळील या पुलाचा एक पिल्लर दबला आहे. त्यामुळे कन्सलटंट नेमून दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. लवकरच हे काम सुरु होईल. सध्या हलकी वाहतूक या पुलावरुन सुरु असून तीसुद्धा बंद केली जाणार आहे.- एम.एम. जैस्वाल, कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग, क्र.२ चंद्रपूर