शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

महारक्तदानाने बाबूजींना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 22:12 IST

ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी लोकमत जिल्हा कार्यालय व लाईफ लाईन ब्लड बँक कंपोनेट आणि अप्रायसेस सेंटर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात महारक्तदान शिबिर घेण्यात आले होते. यावेळी मान्यवरांनी बाबूजींच्या आठवणींना उजाळा दिला.

ठळक मुद्देआठवणींना उजाळा : विविध सामाजिक संघटनांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी लोकमत जिल्हा कार्यालय व लाईफ लाईन ब्लड बँक कंपोनेट आणि अप्रायसेस सेंटर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात महारक्तदान शिबिर घेण्यात आले होते. यावेळी मान्यवरांनी बाबूजींच्या आठवणींना उजाळा दिला.डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय सभागृहात सकाळी ११ वाजता श्रद्धेय बाबूजींच्या प्रतिमेपुढे पुष्पांजली अर्पण करून रक्तदान शिबिराला सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमत परिवारातील ज्येष्ठ सदस्य डॉ. अशोक बोथरा तर उद्घाटक म्हणून यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किशोर जोरगेवार तसेच मंचावर माजी नगरसेवक तथा जल बिरादरी संस्थेचे अध्यक्ष संजय वैद्य, रमण बोथरा, पतंजली योग समिती प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य विमल कांस्टिया, युवा मित्र फाऊंडेशनचे अध्यक्ष महेश काहिलकर, सामाजिक कार्यकर्ता अश्विन मुसळे, लाईफ लाईन ब्लड बँकेचे डॉ. अश्विन बाभरे, वन विभागाचे अ‍ॅड. सुरेंद्र बन्सोड, लोकमतचे शाखा व्यवस्थापक विनोद बुले, लोकमत जिल्हा प्रतिनिधी राजेश भोजेकर, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी अरूण सहाय उपस्थित होते.किशोर जोरगेवार आणि कांस्टिया यांनी लोकमतच्या उपक्रमांची प्रशंसा केली. यावेळी अनेक नागरिकांनी रक्तदान केले. संचालन सोनम मडावी यांनी केले.शतक ओलांडणारे रक्तदाते संजय वैद्यराजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्राच्या माध्यमातून विधायक कार्याचा ठसा उमटविणारे सजग नेतृत्व म्हणून माजी नगरसेवक संजय वैद्य यांची ओळख आहे. मात्र, रक्तदान चळवळीत अत्यंत निष्ठेने योगदान देऊन त्यांनी आरोग्य क्षेत्रातही बांधिलकी जोपासली. गरजु रूग्णांना रक्त मिळावे, यासाठी त्यांनी रक्तदानाची शंभर गाठली होती. ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी रक्तदान करून १०१ हा आकडा पूर्ण केला आहे.