शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
2
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
3
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
4
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
5
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
6
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
7
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
8
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
9
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
10
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
11
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
12
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
13
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
14
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
15
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
16
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
17
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
18
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
19
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना

सामान्य रुग्णालयातून वृद्ध आईसह महिला रूग्ण बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:40 AM

येथील अमराई वॉर्ड क्रमांक १ मधील विवाहित सपना शिवा वाघमारे (४०) या आजारी असल्याने चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात २४ मे रोजी दाखल झाल्या. त्यांच्यासोबत त्यांची आई सुमन गोवर्धन जुमनाके (६०) सोबत होत्या.

ठळक मुद्देरूग्णालय व्यवस्थापनाचे हातवर : वृद्ध पत्नी व आजारग्रस्त मुलगी बेपत्ता असल्याची चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : येथील अमराई वॉर्ड क्रमांक १ मधील विवाहित सपना शिवा वाघमारे (४०) या आजारी असल्याने चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात २४ मे रोजी दाखल झाल्या. त्यांच्यासोबत त्यांची आई सुमन गोवर्धन जुमनाके (६०) सोबत होत्या. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रशासनाने त्यांना रूम क्र. ९ मध्ये दाखल करून घेतले. मात्र दोन दिवसानंतर वृद्ध आईसह महिला रूग्ण बेपत्ता झाली. याबाबत मंगळवारी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.घुग्घुस येथील सपना वाघमारे यांना दुर्धर आजार असल्याने तिची आई सुमन जुमनाके यांनी १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेने २४ मे रोजी रात्री ८.५० ला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रूम नं. ९ मध्ये दाखल केले. दोन दिवसानंतर रूग्ण महिलेचे वडील गोवर्धन जुमनाके यांनी पैशाची जुळवाजुळव करून जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचले असता, मुलगी व पत्नी बेपत्ता असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी संपूर्ण रुग्णालय पिंजून काढला. मात्र दोघींचाही थांगपत्ता लागला नाही.रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, कुणीही काही सांगण्यास तयार नव्हते. त्यामुळे त्यांनी रूग्णालयातील पोलीस चौकीत जाऊन प्रकरणाची माहिती दिली. मात्र पोलीस चौकीतील उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनीही त्यांना नागपूरच्या रूग्णालयात शोधा, घुग्घुस पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा, असा अफलातून सल्ला दिला. हवालदिल झालेले अशिक्षित वडील गोवर्धन जुमनाके यांनी चंद्रपूर, बल्लारपूर या परिसरातील नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र दोघींचाही काहीच पत्ता लागला नाही. त्यामुळे येथील कामगार नेते सैय्यद अनवर यांची भेट घेऊन सर्व माहिती दिली. त्यांनी जुमनाके यांना घेऊन घुग्घुस पोलीस ठाणे गाठले. मात्र सदर घटना चंद्रपूर शहरातील असल्याने चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा, असे ठाणेदाराने सांगितले. यावरून जुमनाके यांनी मंगळवारी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात मुलगी व पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली आहे.याबाबत मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता एस. एस. मोरे यांच्याशी संपर्क साधला असता, प्रकरणाची माहिती कानावर आली असून बुधवारी या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचे सांगितले. निवासी वैद्यकीय अधिकारी मुनघाटे यांना विचारणा केली असता, रूग्णालय मेडिकल कॉलेजला हस्तांतरीत केल्यामुळे आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले. तर जिल्हा शल्य चिकीत्सक राठोड यांनीही मेडिकल कॉलेजशी संपर्क साधावा, असे सांगितले.रूग्णालय प्रशासनाचा बेजबाबदारपणामहिला रूग्ण गंभीर आजारी असल्याने ती चालू शकत नाही. तर तिची आई वयोवृद्ध असल्याने डोळ्याला दिसत नाही. त्यामुळे दोघीही रूग्णालयातून बेपत्ता झाल्याच कशा, हा प्रश्न उपस्थित होत आहे. उपचार सुरू असलेला रूग्ण निघून जाते किंवा बेपत्ता होते. मात्र रूग्णालय व्यवस्थापनाला काहीच कसे माहित नसते, असे विविध प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल