शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

महाज्योती देणार ओबीसी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:27 IST

मूल : राज्य शासनाच्या महाविकास आघाडी सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठीसाठी महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) ...

मूल : राज्य शासनाच्या महाविकास आघाडी सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठीसाठी महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या स्वायत्त संस्थेचीची निर्मिती केली आहे. या माध्यमातून ओबीसी,एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. महत्वाच्या शासकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षा जेईई, एमएच, सीईटी नीट अशा देत असतात. पण त्यासाठी विशेष स्पर्धा परीक्षेचे महागडे कोचिंग क्लास लावण्याची आर्थिक कुवत ओबीसी, भटके व विमुक्त जाती, बारा बलुतेदार आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये नसते. त्यामुळे हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत टिकाव धरू शकत नाही. शासनाच्या महाज्योतीने २०२२ मध्ये होणार्‍या या स्पर्धा परीक्षेसाठी, ओबीसीच्या १० हजार विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण व परीक्षेसाठी तयारी करून देण्याचा कार्यक्रम तयार केला आहे. त्यासाठी वर्ग ११ वी विज्ञान शाखेत शिकणार्‍या ओबीसी विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन महात्मा फुले समता परीषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले यांनी केले आहे.