शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

सरत्या वर्षात ५२७ वीजचोरांना महावितरणचा ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2017 01:08 IST

महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात गेल्या वर्षात वीजचोरांना चांगलाच दणका बसला. चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर

३८ लाखांच्या वीजचोऱ्या : ५३ जणांविरुध्द केला गुन्हा दाखल चंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात गेल्या वर्षात वीजचोरांना चांगलाच दणका बसला. चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर व गडचिरोली मंडळ मिळून ५२७ वीजचोरांना महावितरणने यंदा जोरदार शॉक दिला. या वीज चोरांनी तब्बल ३७ लाख ९४ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले. या ४१६ ग्राहकांकडून वीजचोरीपोटी असलेली ३० लाख २७ हजारांची रक्कम वसूल करण्यात आली. याशिवाय वीजचोरी करणाऱ्या ५३ जणांविरूध्द गुन्हाही नंोदविण्यात आला. चंद्रपूर मंडळाने १ एप्रिल २०१६ ते ३१ नोव्हेंबर २०१६ पर्यंत १६ लाख ०६ हजार रूपयांच्या वीजचोऱ्या एकटया चंद्रपूर मंडळात उघडकीस आणल्या व एकूूण १५२ वीजचोरांवर कडक कारवाई करण्यात आली. गडचिरोली मंडळाने २१ लाख ८२ हजार रूपयांच्या वीजचोऱ्या उघडकीस आणल्या व एकूण ३७५ वीजचोर महावितरणने केलेल्या कारवाईत सापडले. यापैकी सर्वाधिक २०१ प्रकरणे ब्रम्हपुरी विभागातील असून, १०८ प्रकरणे गडचिरोली विभाग, ६६ आलापल्ली, २६ वरोरा विभागातील, ६६ बल्लारपूर विभाग तर ६० चंद्रपूर विभागातील आहेत. या सर्व वीजचोरांविरूध्द, वीजकायदा २००३ च्या कलम १३५ अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती महावितरणचे जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे यांनी दिली. आढळलेल्या वीजचोऱ्यात २५१ वीजचोरांनी आकडे टाकून तर २७६ वीजचोरांनी सरळ मीटरसोबत छेडछाड करीत वीजचोरी केल्याचे महावितरणच्या गस्ती पथकास आढळून आले. वीजचोरी करण्यासाठी वीजचोरांनी मीटरमधील कॉईलची लांबी कमी करणे, रिमोट कंट्रोलचा वापर, मीटर बायपास करणे किंवा विना मीटर वीजवापर करणे, मीटरमध्ये रेजिस्टंस टाकणे अशा विविध क्लुप्त्या वापरून वीजचोरी केल्याचे आढळले. चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी वीजग्राहकांना वीजचोरीपासून प्रवृत्त होण्याचे व वीजबील वेळेवर भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. (शहर प्रतिनिधी) पावसाचा बसला होता फटका अवकाळी पाऊस तसेच वादळवाऱ्यामुळे सरत्या वर्षात महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातील चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्हयात ़एकूण ७१४ उच्चदाबाचे तर १९५२ लघुदाबाचे खांब तर १४६ रोहित्राचे नुकसान झाले आहे. यापैकी ६७२ उच्चदाबाचे तर १८७८ लघुदाबाचे खांब पूर्ववत उभे करण्यात आले. तसेच १४४ रोहित्र दुरूस्त करण्यात आले. विशेष म्हणजे, सरत्या वर्षात महावितरण कंपनीकडून तब्बल चार हजार ७८ कृषीपंपाच्या वीज जोडण्या करून देण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली.