शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पत्रिका तर मिळाली; पण लग्नाला जायचे की नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:24 IST

बल्लारपूर : कोरोना लोकांना स्वस्त बसू देत नाही. त्याच्या भयाने चिंतेत दिवस ढकलावे लागत आहेत. ज्यांच्या घरात लग्नादी कार्यक्रम ...

बल्लारपूर : कोरोना लोकांना स्वस्त बसू देत नाही. त्याच्या भयाने चिंतेत दिवस ढकलावे लागत आहेत. ज्यांच्या घरात लग्नादी कार्यक्रम ठरले आहे, त्यांच्यापुढे नाना अडचणी येत आहेत. सोबतच यजमानांनी आपल्या नातेवाईक, परिचित यांना निमंत्रित केले आहे; मात्र तेही लग्नाला यायचे की नाही, या प्रश्‍नाने ग्रासले आहेत. कारण ५० हून अधिक लोकांची उपस्थिती लग्नप्रसंगी नको, ही प्रशासकीय व्यवस्थेने घालून दिलेली अट आहे.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर दिवाळीपासून सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरू झाले. सोबतच लग्न जोडणीला वेग आला. निमंत्रणाच्या चारशे-पाचशे पत्रिका बाहेरगावी पाठविल्या गेल्या. सोबतच गावातही वाटल्या. लग्न धुमधडाक्यात सतराशे- अठराशे लोकांच्या उपस्थितीत मस्तपैकी करू, याचा वर आणि वधू दोन्ही घरी आनंद ! त्यात कोरोनाचे परत विघ्न आले आणि सारेच गणित बिघडले. मंगल कार्यालय, कॅटरर्स यांना ॲडव्हान्स दिले. कपडे, सोने दागिन्यांची खरेदी झाली; पण जाचक नियमांनुसार ५० संख्येत लग्न कसे पार पाडायचे, ही चिंता साऱ्यांना सतावू लागली आहे. यजमानांसोबतच निमंत्रितही गोत्यात येत आहेत. आपण सहपरिवार लग्नात गेलो तर यजमान संकटात येणार, यामुळे निमंत्रितच फोनने यजमानांना 'आम्ही लग्नात यायचे काय?' अशी विचारणा करू लागले आहेत. त्यावर याचे उत्तर असते या ! पण एकटेच ! हे काल्पनिक नाही वास्तव आहे. अशी विचित्र स्थिती कोरोनाने आणली आहे.