शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

म. गांधी १५० वे जयंती वर्ष; चंद्रपूर नगर परिषदेने प्रदान केले होते गौरवपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 16:04 IST

असहकार आंदोलन व अपृश्यता निर्मूलन या दोन उद्दिष्ठांसाठी गांधीजींनी ४ फेब्रुवारी  १९२७ व १४ नोव्हेंबर १९३३ रोजी चंद्रपूरला भेट दिली. या दोन्ही भेटीत तत्कालीन चांदा नगर परिषदच्या वतीने गांधीजींना गौरवपत्र प्रदान करण्यात आले होते.

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रिटीश सत्तेविरूद्धचा भारतीय स्वातंत्र्यलढा देशभरात पोहोचावा, यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी विविध राज्यांमध्ये दौरे करून जनमानस चेतविले. असहकार आंदोलन व अपृश्यता निर्मूलन या दोन उद्दिष्ठांसाठी गांधीजींनी ४ फेब्रुवारी  १९२७ व १४ नोव्हेंबर १९३३ रोजी चंद्रपूरला भेट दिली. या दोन्ही भेटीत तत्कालीन चांदा नगर परिषदच्या वतीने गांधीजींना गौरवपत्र प्रदान करण्यात आले.देशभरात असहकार आंदोलन सुरू केल्यानंतर महात्मा गांधी हे १९२७ च्या फेब्रुवारी  महिन्यात सेवाग्राम येथे होते. दरम्यान, चंद्रपुरातील तत्कालीन नेते पंडित बालगोंविद तिवारी, विश्वनाथ दीक्षित, मा. सां. कन्नमवार, बाजीराव फुलझेले, बळवंतराव देशमुख, पुराणिक, सेठ लोमाकरण, कोवळे, शंकर वैद्य, डॉ. तेलंग, अब्दुल रजाक आदींच्या उपस्थितीत दाजीबाजी देवईकर यांच्या घरी बैठक घेतली. गांधीजींना चंद्रपुरात बोलाविण्याचे निश्चित केले. त्यानंतर देवईकर व मा. सां. कन्नमवार यांनी सेवाग्राम येथे जाऊन गांधीजींची भेट घेतली. गांधीजींनी ४ फेब्रुवारी  १९२७ रोजी येण्याचे मान्य करताच जय्यत तयारी करण्यात आली. टिळक मैदानात जाहीर सभा झाली. स्वागत समितीचे अध्यक्ष विश्वनाथ दीक्षित व सचिव खुशालचंद्र खजांची यांनी भूषविले. नगर परिषदने गांधीजींना गौरवपत्र प्रदान केले. महात्मा गांधीजींनी चंद्रपूर शहराला १४ नोव्हेंबर १९३३ रोजी दुसऱ्यांदा भेट दिली. यावेळी अस्पृश्यता निवारणाचा विचार मांडण्यासाठी याच मैदानावर सभा झाली. या सभेत बहुसंख्य दलित बांधवांना बोलावण्यात आले. देवाजी बापू खोबरागडे यांनीही विचार मांडले. चंद्रपुरातील जनतेने गांधीजींना सात हजारांची थैली प्रदान केली.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी