शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अल्प मतदान कुणाच्या पथ्यावर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:04 IST

भद्रावती नगर परिषदची निवडणूक रविवारी शांततेत पार पडली. या निवडणुकीत केवळ ५७ टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी मतदानाचा टक्का घसरल्याने सर्वच पक्षातील दिग्गज उमेदवारांमध्ये धडकी भरली आहे. यावेळी ३२ हजार ८४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

ठळक मुद्देभद्रावती नगर परिषद निवडणूक : केवळ ५७ टक्के मतदान, दिग्गज उमेदवारांमध्ये धडकी

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : भद्रावती नगर परिषदची निवडणूक रविवारी शांततेत पार पडली. या निवडणुकीत केवळ ५७ टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी मतदानाचा टक्का घसरल्याने सर्वच पक्षातील दिग्गज उमेदवारांमध्ये धडकी भरली आहे. यावेळी ३२ हजार ८४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.नगराध्यक्षपदाच्या आठ तर नगरसेवकपदाच्या २७ जागांसाठी मतदान रविवारी मतदान झाले. नगरसेवकपदासाठी १४५ उमेदवार रिंगणात होते. नगराध्यक्षपदाची मुख्य लढत शिवसेनेचे अनिल धानोरकर व भाजपाचे सुनील नामोजवार यांच्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बीआरएसपीचे अ‍ॅड. भुपेंद्र रायपुरे हेसुद्धा नगराध्यक्षपदासाठी मुसंडी मारू शकतात, अशीही चर्चा शहरात रंगत आहे. यंदाच्या निवडणुकीत कमी मतदान झाल्याने सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. विजयासाठी उमेदवारांनी जोरदार प्रचार केला होता. बहुतेक प्रभागामध्ये आर्थिकदृष्ट्या तगडे उमेदवार उभे झाले होते. त्यामुळे नगरसेवकपदासाठीही अटीतटीची लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक ८ (अ) मध्ये शिवसेनेचे प्रफुल्ल चटकी व भाजपाचे योगेश गाडगे, प्रभाग क्र. ६ (ब) मध्ये शिवसेनेचे संतोष आमने व राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहन कुटेमाटे (ब) मध्ये शिवसेनेच्या छबु राऊत व काँग्रेसच्या सरिता सूर, प्रभाग क्र. १ (ब) मध्ये शिवसेनेचे विनोद वानखेडे व भाजपाचे मनोज आष्टनकर प्रभाग ७ (अ) मध्ये अपक्ष उमेदवार नंदू पठाल व शिवसेनेचे नागपुरे (ब) काँग्रेसच्या शितल गेडाम, भाजपाच्या स्वप्ना शेरकुरे व शिवसेनेच्या मोनिका दोडके, प्रभाग क्र. ५ (ब) मध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खारकर, भारिप बहुजन महासंघाचे संदीप चटप, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे फैयाज शेख आदी उमेदवारांनीही जोरदार प्रचार केला होता. मतदारांशी संपर्क साधून शहर विकासाची आश्वासने दिलीत. त्यामुळे प्रचारात मोठी रंगत आली होती. प्रभाग क्र. २ (ब) मध्ये भारिप बहुजन महासंघाचे सुनील खोब्रागडे व शिवसेनेचे रमेशदास यांनीही प्रचारात मुसंडी मारली. त्यामुळे या दोन उमेदवारांमध्येच चुरस होण्याची चर्चा सुरू आहे. सकाळी सात वाजता मतदानाला सुरू झाली. पण काही मतदान केंद्रामध्ये शुकशुकाट होता. दुपारी १.३० वाजतापासून मतदानाला वेग आला. सकाळी ९.३० वाजेपर्यंत ५.६२ टक्के, दुपारी १.३० वाजेपर्यंत २९.११ टक्के इतके मतदान झाले होते. दुपारी ३.३० वाजेपर्यंत केवळ ४४ टक्के मतदान झाल्याने विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसत होती. मतदानाची टक्केवारी घसल्याने शहरातील मतदार कुणाच्या बाजूने कौल देतात, यावर आता चर्चा रंगू लागल्या आहेत.आज मतमोजणीनगर परिषद निवडणूकीची मतमोजणी सोमवारी चिरादेवी मार्गावरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात होणार आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात जिल्हादंडाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी सकाळी सहा ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यत कलम १४४ लागू केली आहे. त्यामुळे मतमोजणी परिसरात दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्याथवर बंदी घालण्यात आली आहे.