शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

९३ हजार बहीण-भावाच्या प्रेमाला डाक विभागाने बांधले रेशीम बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:30 IST

चंद्रपूर : बहीण भावाच्या नात्याला एकत्रित बांधून ठेवण्यासाठी पोस्ट कार्यालय नेहमीच महत्त्वाचा धागा ठरले आहे. यावर्षीही सुटीच्या दिवशीही अविरत ...

चंद्रपूर : बहीण भावाच्या नात्याला एकत्रित बांधून ठेवण्यासाठी पोस्ट कार्यालय नेहमीच महत्त्वाचा धागा ठरले आहे. यावर्षीही सुटीच्या दिवशीही अविरत सेवा देत पोस्टमनने भाऊ-बहीणींमध्ये आत्मिक प्रेमाचे नाते जपले आहे. यावर्षी तब्बल ९३ हजार हजार राखी जिल्हा, देश तसेच देशसेवा करणाऱ्या सैनिक भावांना पोहचविण्याचे महत्त्वाचे काम पोस्ट विभागाने केले आहे.

प्रत्येक वर्षी बहिणीला भावाकडे आणि भावाला बहिणीकडे जाणे शक्य होत नाही. कोरोना संकट तसेच येणे अशक्य असल्यामुळे असंख्य बहिणींनी यावर्षीही डाकेने राख्या पाठविणे पसंत केले आहे. पोस्ट विभागाने तब्बल ६० हजार राख्या चंद्रपूर येथून देशातील विविध भागात पाठविल्या आहे. तर शनिवार तसेच रविवारी १८ हजार राख्यांचे चंद्रपूर जिल्ह्यात वितरण केले आहे. विशेष म्हणजे, देशाच्या सीमेवर काम करणाऱ्या भावांनाही त्यांच्या बहिणीची राखी पोहचविण्याचे महत्त्वाचे काम पोस्टमनने केले आहे. यावर्षी तब्बल १५ हजार राख्या चंद्रपूर जिल्ह्यातून बाॅर्डरवर पोहचविण्यात आल्या आहेत.

कोरोनामुळे निर्बंध आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून पोस्टाने राख्या पाठविण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पोस्ट विभागानेही तत्परतेने भावांपर्यंत राख्या पोहचवित भाऊ-बहीणींच्या प्रेमात आणखीच आत्मियता निर्माण केली आहे. यासाठी सिनिअर पोस्टमास्टर कोमकोमवार, असिस्टंट पोस्टमास्टर (मेल) प्रशांत कन्नमवार, मेल शार्टर राजू मत्ते यांच्यासह जिल्ह्यातील विविभ गावातील पोस्टमनने आपले काम चोखपणे बजावले आहे.

बाॅक्स

चंद्रपूरात १८ हजार राख्यांचे वितरण

चंद्रपूर जिल्ह्यात रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत १८ हजार राख्यांचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे, शनिवारपर्यंत १० हजार तसेच रविवारी दुपारपर्यंत ८ हजार राख्या पोहचविण्यात पोस्टमनने दिवसरात्र एक करीत बहीण- भावाच्या नात्यात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

बाॅक्स

बाहेरगावी पाठविल्या ६० हजार राख्या

भारतीय डाक विभागाने ६० हजार राख्या बाहेर जिल्ह्यासह इतर राज्यात पाठविल्या आहेत. बहिणी भागाचे हे नाते जोपासण्यासाठी डाक विभागाकडून आधार दिला जात आहे. कोरोना संकटामुळे यावर्षीही अनेक बहिणी भावाच्या भेटीला जाऊ शकल्या नाही. त्यांच्यासाठी पोस्टमनने भावाची भूमिका बजावली आहे.

बाॅक्स

पोस्ट कार्यालय -४९३

एकूण पोस्टमॅन ३५०

कोट

रक्षाबंधणाचा सण महत्त्वाचा असतो. त्यामुळे पोस्ट कार्यालयाने यावर्षीही सुटीच्या दिवसी राख्या घरपोच वितरणाचे काम केले आहे. जिल्ह्यात ३५० पोस्टमनने हे कर्तव्य बजावले आहे. मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही कोरोना संकटामुळे अनेकांनी गावी जाणे टाळले. त्यामुळे पोस्ट कार्यालयात मोठ्या प्रमाणात राख्या वितरणाचे काम होते. ते सक्षमपणे सर्वांनी बजावले.

-प्रशांत कन्नमवार

असिस्टंट पोस्टमास्टर मेल, चंद्रपूर