शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
2
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
3
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
4
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
5
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
6
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
7
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
8
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
9
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
10
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
11
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
12
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
13
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
14
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
15
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
16
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
17
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
18
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
19
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
20
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली

पेट्रोलपंपावर होतेय ग्राहकांची लूट

By admin | Updated: October 8, 2014 23:23 IST

चंद्रपूर शहर व ग्रामीण भागात असलेल्या अनेक पेट्रोल पंपावर ग्राहकांची सर्रास लूट सुरु आहे. याकडे मात्र, पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्राहकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे.

चंद्रपूर : चंद्रपूर शहर व ग्रामीण भागात असलेल्या अनेक पेट्रोल पंपावर ग्राहकांची सर्रास लूट सुरु आहे. याकडे मात्र, पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्राहकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. शहरातील अनेक पेट्रोलपंपावर डिझेल, पेट्रोलसाठी लॉक मशीन नाही. त्यामुळे या पंपावर आकड्यात मोठा खेळ खेळला जात आहे. शंभर रुपयाचे पेट्रोल टाकले तरी प्रत्यक्षात मात्र, शंभर रुपयाचे पेट्रोल मिळत नाही. ग्राहकाला मात्र, आपन शंभर रुपयाचे पेट्रोल टाकल्याचे आकड्यावरुन दिसून येते. अनेक पेट्रोल पंपावर मशीनमध्ये तशी सेंटींग करुन ठेवण्यात आली असून आकड्यात आपन जेवढे रुपयाचे पेट्रोल टाकतो तेवढेच दाखविले जाते. मात्र, प्रत्यक्षात तेवढे पेट्रोल मिळत नाही. वाहनाच्या टंकीत एकदा पेट्रोल पडल्यावर पेट्रोल किती मिळाला याचा ग्राहकालाही अंदाज येत नाही. त्यामुळे पेट्रोलपंप चालकांचे चांगलेच फावत आहे. मात्र, एखाद्या ग्राहकांकडून बॉटलमध्ये पेट्रोल खरेदी केले जाते, तेव्हा मात्र, आपली पोल खुलेल या भितीने पेट्रोल देण्यास चक्क नकार दिला जात आहे. हा प्रकार अनेक पेट्रोल पंपावर सुरु आहे. मात्र, पुरवठा विभाग सर्रास दुर्लक्ष करीत आहे. पेट्रोलमध्ये होत असलेली लूट ग्राहकाच्या निदर्शनास येत नाही. त्यामुळे ग्राहक तक्रार करीत नाही. एखादा ग्राहक पेट्रोल पंपावर लूट होत असल्याची ओरड केल्यासा पंपावर कार्यरत कर्मचारी त्याला मारहाण करुन हाकलून लावल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. पंप चालकांची मनमानी सुरु असून लूट होत असली तरी निदर्शनास येत नसल्याने कारवाईही होत नाही. पुरवठा विभागाने याची तत्काळ दखल घेऊन ग्राहकांची लूट थांबवावी, पेट्रोल पंपाची नियमीत तपासणी करण्याची मागणी नाागरिकांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)