शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

परसोडी धान्य दुकानदाराकडून नागरिकांची लूट

By admin | Updated: January 15, 2015 22:49 IST

येथून आठ किलोमिटर अंतरावर असलेल्या परसोडी येथील धान्य दुकानदार गावकऱ्यांना जादा पैसे वसुल करून त्रास देत असल्याची तक्रार गोंडपिपरी तहसिलदारांकडे करण्यात आली आहे.

कोठारी: येथून आठ किलोमिटर अंतरावर असलेल्या परसोडी येथील धान्य दुकानदार गावकऱ्यांना जादा पैसे वसुल करून त्रास देत असल्याची तक्रार गोंडपिपरी तहसिलदारांकडे करण्यात आली आहे. सदर धान्य दुकानदाराचे दुकान रद्द करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील परसोडी येथे २०-२५ वर्षापासून सरकारी स्वस्त धान्य दुकान चालविण्यात आहे. त्यांच्याकडे केरोसीन वाटपाचा परवाना आहे. सदर दुकानदार गावकऱ्यांना सरकारी दरापेक्षा जादा दराने धान्याचे वितरण करीत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. गावकऱ्यांच्या राशन कार्डावर नमुद दर्शविल्या युनिटप्रमाणे कधीही धान्य देत नाही. दुकानासमोर भावफलक लावण्यात आलेला नाही. त्याप्रमाणे धान्य साठ्याचा फलकही लावण्यात आला नाही. ग्राहकांना सदर दुकानदार धान्य खरेदीची पावती देत नाही. पावतीची मागणी केल्यास ग्राहकांसोबत असभ्य शब्दात बोलून त्याची मानहाणी करतो, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. सदर प्रकार मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. याबाबत गावकऱ्यांनी तहसिलदारांकडे तक्रार केली असता केवळ चौकशीचा फार्स करीत धान्य दुकानदारांला वाचविण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न केला जातो. योग्य, निष्पक्ष चौकशी करण्यास टाळाटाळ करतो. याबाबत तक्रारीची दखल घेत तहसिलदार यांनी नुकतीच दुकानदारांची नायब तहसिलदार शेख अब्दुला यांचेमार्फत चौकशी केली. मात्र त्यात त्यांनी दुकानदारांस झुकते माप दिल्याचा संशय सुरेंद्र चोथले यांनी वर्तविला आहे. चौकशी अधिकाऱ्याने ग्रामपंचायतीमध्ये किंवा सरपंच, पोलिस पाटील यांच्याकडे चौकशी करण्यापेक्षा दुकानदाराच्या घरी बसून गावकऱ्यांचे बयान नोंदविण्याचा प्रयत्न केला. धान्य दुकानदाराच्या जाचाला कंटाळलेले व दुकानदाराच्या भितीपोटी नागरिक मुक्तपणे दुकानदाराच्या घरी बयाण देण्यास कचरत होते.सदर दुकानदाराकडे केरोसीन वाटप करण्याचा परवाना आहे. गरीबांचे केरोसीन धनदांडग्यांना जादा दरात विकताना गावकऱ्यांनी रंगेहात पकडले. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. राजकीय क्षेत्रात दबदबा निर्माण करून सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून स्वत: गोरखधंदा करीत गावकऱ्यांची पिळवणूक करण्याचा सपाटा या दुकानदाराने धरल्याच्या अनेक तक्रारी शासनदरबारी आहेत. मात्र गावकऱ्यांच्या तक्रारीची गंभीर दखलच घेतली जात नाही. (वार्ताहर)