शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

भेजगाव परिसरात बोगस डॉक्टरांकडून रुग्णांची लूट

By admin | Updated: May 18, 2014 00:12 IST

भेजगावसह परिसरात अनेक गावात बोगस डॉक्टरांनी आपला व्यवसाय थाटला आहे. सदर डॉक्टर रुग्णांची आर्थिक लुट करीत आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.

भेजगाव : भेजगावसह परिसरात अनेक गावात बोगस डॉक्टरांनी आपला व्यवसाय थाटला आहे. सदर डॉक्टर रुग्णांची आर्थिक लुट करीत आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.

परिसरातील चिचाळा, गडीसुर्ला, येरगाव तथा अन्य गावांत बोगस डॉक्टरांनी रुग्णालये उघडले आहेत. कुठलीही वैद्यकीय पदवी नसतानाही एखाद्या डॉक्टरकडे काही दिवस अनुभव घेतल्यानंतर ग्रामीण भागात आपले प्रस्थ वाढवून आर्थिक लुट करीत असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे.

भेजगावसह परिसरातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असून येथील गरीब नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा उचलून ही मंडळी त्यांची लूट करीत आहेत. भेजगाव येथील बोगस डॉक्टरकडे उपचारासाठी रुग्ण गेले तर रुग्णांची तपासणी करून आवश्यकता नसतानाही प्रत्येक रुग्णाला दोन इंजेक्शन दिल्या जाते. याबाबत रुग्णांनी डॉक्टरला विचारणा केली तर, आम्ही किरायाने राहत असल्याने आम्हाला परवडेल का, असा प्रतिप्रश्न बोगस डॉक्टर करतात. आपल्या पोटाची खडगी भरण्याकरिता गरीब व अज्ञान रुग्णांची लुट करावी का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. वैद्यकीय पदव्याही स्वत:च्या नावासमोर जोडण्यात आल्या आहेत. पाईल्स, भगंदर, हॉयड्रोसिल आदी रोगांवर खात्रीलायक उपचार करण्याची पत्रके रुग्णांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)