शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सेतू केंद्रात नागरिकांची लूट

By admin | Updated: July 14, 2014 23:52 IST

शासनातर्फे मोठ्या गावात सेतू केंद्र स्थापन करून ग्रामीण नागरिकांना गावातच शासकीय कागदपत्र मिळण्यासाठी सोय केली आहे. मात्र येथे नागरिकांची लुट सुरु असून वाट्टेल तसे दर नागरिकांकडून वसुल केले जात आहे.

तळोधी (बा.) : शासनातर्फे मोठ्या गावात सेतू केंद्र स्थापन करून ग्रामीण नागरिकांना गावातच शासकीय कागदपत्र मिळण्यासाठी सोय केली आहे. मात्र येथे नागरिकांची लुट सुरु असून वाट्टेल तसे दर नागरिकांकडून वसुल केले जात आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे.पूर्वी तहसील कार्यालयातून नागरिकांना प्रमाणपत्र मिळत होते. मात्र यात नागरिकांना आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. त्यातच कागदपत्र वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या होत्या. यापासून नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्ये सेतू केंद्र स्थापन करण्यात आले. मात्र आता काही केंद्रातून नागरिकांची लूट सुरु आहे. त्यामुळे या केंद्राकडे शासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.गावातील अनेक सेतू केंद्रामध्ये दरपत्रक नसल्याने नागरिकांकडून वाट्टेल तेवढे दर आकारल्या जात आहे. या सेतू केंद्रातून उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला, वय अधिवास, जात, राष्ट्रीयत्त्व, जन्म, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, महसूल प्रमाणपत्र. आठ (अ), सात-बारा अशा अनेक प्रकारचे प्रमाणपत्र कमी वेळात, मिळून नागरिकांच्या वेळेची व आर्थिक बचत होते. परंतु ग्रामीण भागातील काही सेतू केंद्रात प्रमाणपत्राच्या शासकीय दराचे दर पत्रक न लावता ग्राहकांकडून लुट सुरू आहे. सध्या विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रांची आवश्यकता आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी या केंद्रावर गर्दी करतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांकडून सुद्धा काही केंद्र चालक आर्थिक लुट करीत आहेत. ग्रामीण भागातील मान्यताप्राप्त सेतूकेंद्रात नागरिकांची आर्थिक लूट होवू नये, यासाठी शासकीय दर पत्रकानुसार नागरिकांनी प्रमाणपत्र हस्तगत करावे. यानुसारच नागरिकांनी सेतू केंद्रात पैसे देऊन रितसर पावती घ्यावी. ज्या सेतू केंद्रात पावती दिली जात नाही त्या सेतू केंद्राची जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रार करावी, अशी विनंती वामनराव बारसागडे यांनी केली आहे. (वार्ताहर)