शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वाचनालयाचे रुप बदलणार

By admin | Updated: March 3, 2016 01:06 IST

बल्लारपूर शहरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीकरिता लागणारी सर्वच प्रकारची पुस्तके आता नगर परिषदेच्या वसंत सार्वजनिक वाचनालयात उपलब्ध होणार आहेत.

मुलींकरिता वेगळा कक्ष : स्पर्धा परीक्षेसाठी करणार मार्गदर्शनबल्लारपूर : बल्लारपूर शहरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीकरिता लागणारी सर्वच प्रकारची पुस्तके आता नगर परिषदेच्या वसंत सार्वजनिक वाचनालयात उपलब्ध होणार आहेत. एवढेच नव्हे तर अशा विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची सोयही वाचनालयात करुन दिली जाणार आहे. महिलांकरिता वेगळे अभ्यास कक्ष राहणार आहे.महाविद्यालयाचे शिक्षण घेत असलेले तसेच सुशिक्षित बेरोजगार कांही युवक-युवती या वाचनालयात अभ्यास करण्याकरिता, तद्वतच वर्तमानपत्रातून माहिती घेण्याकरिता नियमित येत असतात. पण, या वाचनालयाकडे नगर परिषदेच्या शिक्षण विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून वाचकांना गैरसोयीशी सामना करावा लागत आहे. याची झळ या विद्यार्थ्यांनाही अनेक प्रकारे बसत आहे. ही बाब न.प.च्या नवनिर्वाचीत शिक्षण सभापती वर्षा सुंचूवार यांनी मुख्याधिकारी विपीन मुदधा यांच्या कानावर घातली. मंगळवारी विपीन मुदधा हे स्वत: वाचनालयाची स्थिती बघायला गेले. याप्रसंगी अभ्यासाकरिता उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या अडचणी त्यांच्या पुढे मांडल्या व स्पर्धा परीक्षेच्या तयारीची पुस्तके या वाचनालयात असावी, अशी मागणी केली. यावर मुदधा यांनी विद्यार्थ्यांकडून पुस्तकांची यादी मागितली व ही पुस्तके लवकरच येतील, असे आश्वासन दिले. वाचनलय सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत उघडे असावे, अशीही मागणी विद्यार्थ्याची होती. बुधवारपासून त्यावर अंमलबजावणीही झाली आहे. तद्वतच मुलींच्या अभ्यासाकरिता वेगळ्या कक्षाची सोय केली जात आहे. या वाचनालयाची व्यवस्था आणि स्वच्छतेबाबत दुरवस्था झाली आहे. वाचनालयाची इमारत तसेच या इमारतीच्या सभोवतालच्या जागेचा कायापालट करण्याचे मुदधा यांनी ठरविले आहे. संरक्षक भिंत वा तारेचे कुंपण घालणे गरजेचे आहे. पुढे तेही केले जाणार असल्याचे मुदधा यांनी सांगितले. मुख्याधिकारी यांच्या या भेट व चर्चेप्रसंगी शिक्षण सभापती वर्षा सुंचूवार, श्रीनिवास सुंचूवार, पत्रकार मंडळी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)