शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

‘कॉप’चा लॉलीपॉप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 22:39 IST

भद्रावती नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली. ७ आॅक्टोबरला उपाध्यक्षपदाची निवडणूक आणि सभापती व स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार आहे. त्यामुळे मागच्या दारातून नगरपालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून संधी देऊ, असा लॉलीपाप देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याकरिता राजकीय पक्षांसह अपक्षही मनधरणी करण्याच्या कामाला लागले आहेत.

ठळक मुद्देस्वीकृत सदस्यत्वासाठी चढाओढ : कॉप मिळणार की कॅप?

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : भद्रावती नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली. ७ आॅक्टोबरला उपाध्यक्षपदाची निवडणूक आणि सभापती व स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार आहे. त्यामुळे मागच्या दारातून नगरपालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून संधी देऊ, असा लॉलीपाप देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याकरिता राजकीय पक्षांसह अपक्षही मनधरणी करण्याच्या कामाला लागले आहेत.२७ सदस्य संख्या असलेल्या भद्रावती न.प. मध्ये सत्ताधारी शिवसेना १६, भाजपा ४, भारिप ४, कॉंग्रेस २, अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. तीन स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात येणार आहेत.संख्याबळानुसार शिवसेनेच्या वाट्याला दोन स्वीकृत सदस्य आले आहेत. उरलेल्या एका सदस्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजपा व भारिपकडेही चार सदस्य असल्याने चढाओढ लागली आहे. यातच काँग्रेसचे २ नगरसेवक व अपक्ष उमेदवाराचा पांठिबा कोणाला मिळतो याचीही चाचपणी केली जाते आहे. काँँग्रेस व अपक्ष स्वीकृत सदस्यांसाठी उत्सुक असल्याची चर्चा आहे. स्वीकृत सदस्यत्वासाठी विविध राजकीय पक्षांकडून कोणाचे नाव समोर येते. त्याबाबतची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. ज्यांना सार्वत्रिक निवडणुकीत काही कारणास्तव सहभाग घेता आला नाही, अशांना तसेच पक्षातील जुन्या लोकांना या निमित्ताने संधी मिळावी, अशीही चर्चा आहे. या निवडणुकीत जे लढले पण हारले त्यांनाही स्वीकृत सदस्य व्हावे, अशी इच्छा आहे. त्यामुळे सदस्यपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याविषयी नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. अनेकांना कॉपचा ‘लॉलीपॉप’ दाखविण्यात आला आहे.