सखींनी अर्ज करावे : उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सखींचा सन्मानचंद्रपूर : एखाद्या क्षेत्रात निरंतर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सखींच्या कार्याचा लोकमत सखी मंचच्या वतीने ‘ लोकमत सखी गौरव अॅवार्ड’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. लवकरच आयोजित एका नेत्रदीपक सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात येणार आहे.विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांच्या असाधारण कर्तुत्वाचा गौरव व प्रसिध्दीपासून दूर असलेल्या महिलांच्या कार्याला जगासमोर आणण्याचा प्रयत्न या पुरस्कराच्या माध्यमातून केला जाणार आहे. यावर्षी लोकमत सखी गौरव अवार्ड सात क्षेत्रात विभागून देण्यात येणार आहे. यात वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य व कला, क्रीडा, उद्योग व व्यवसाय आणि शौर्य या क्षेत्राचा समावेश आहे. सखींनी यापैकी कुठल्याही एका क्षेत्रात जर उल्लेखनीय कार्य केले असेल तर त्याची संपूर्ण माहिती आपल्या रंगित छायाचित्रासह लोकमत जिल्हा कार्यालय, दुसरा माळा, धनराज प्लाजा बिल्डींग, आझाद बगिचाजवळ, चंद्रपूर या ठिकाणी २ आॅक्टोंबरपर्यंत जमा करावी. पाठविलेल्या माहितीत आपण कार्य केलेल्या क्षेत्राचा स्पष्ट उल्लेख करावा. आपल्या कार्याचा निश्चितच गौरव केला जाईल. आपण पाठविलेल्या अर्जाचे तज्ज्ञ परीक्षकांकडून परीक्षण केले जाणार आही. यात निवड झालेल्यांना शानदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. अधिक माहितीकरिता लोकमत सखी मंचच्या जिल्हा संयोजिका पूजा ठाकरे (९०११३२२६७४) आणि युवा नेक्स्टचे अमोल कडुकर (९२७०१३१५८० ) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सखी मंचच्या वतीने करण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)
लोकमत सखी गौरव अॅवार्ड
By admin | Updated: September 25, 2016 01:26 IST