शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; प्रमुख उमेदवारांचे शाब्दिक युद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:25 IST

चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक चांगलीच रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. उमेदवारी अर्ज दाखल झाल्याबरोबर काँग्रेसच्या उमेदवाराकडून भाजप उमेदवारावर आरोपाचे बाण सोडण्यात आले, ...

ठळक मुद्देलोकसभेचा आखाडा : पत्रकार परिषदेतून आरोपांच्या फैरी

चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक चांगलीच रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. उमेदवारी अर्ज दाखल झाल्याबरोबर काँग्रेसच्या उमेदवाराकडून भाजप उमेदवारावर आरोपाचे बाण सोडण्यात आले, तर भाजप उमेदवाराने विकासाची गाथा वाचून आरोपाचे खंडन करतानाच भाजपची उमेदवारी घरबसल्या येते, तर काँग्रेसच्या उमेदवारीसाठी दिल्लीत जावून भीक मागावी लागते, अशा शब्दात आरोपांच्या फैरी झाडणे सुरू झाले आहे. या आरोपांमुळे निवडणुकीला वेगळे वळण येत असले तरी मतदार हे आरोप किती गांभिर्याने घेतात हे बघण्यासारखे आहे.न केलेल्या कामांचेही श्रेय लाटतात या क्षेत्राचे खासदार- सुरेश धानोरकरचंद्रपूर : काँग्रेस उमेदवार सुरेश धानोरकर यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत भाजप उमेदवार हंसराज अहीर यांच्यावर थेट आरोप केले. चंद्रपूर मतदार संघाचा २० वर्षांपासून विकास झाला नाही. ६० हजार लोकांना नोकऱ्या मिळवून दिल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री सांगत आहेत. खासदार या नात्याने एकही उल्लेखनीय काम केले नाही. या पूर्वीच्या निवडणुकीत तिरंगी लढती झाल्याने ते निवडणूक जिंकत आले आहे. ते युतीचे खासदार असताना त्यांच्याकडून नेहमीच सापत्न वागणूक मिळाली. परिणामी युतीचा आमदार असतानाही आंदोलने करावी लागली, अशी टीकाही धानोरकर यांनी यावेळी केली. या निवडणुकीत शिवसेनेने भाजपशी केलेली युती पटली नाही. आधी आरोप करायचे आणि नंतर एकत्र यायचे हे पटले नाही. आपण अस्वस्थ झालो. लोकसेवा करायची म्हणून शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिला. काँग्रेसने काही गटाचा विरोध असतानाही तिकीट दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी बोलून तिकीट मिळूवन दिली.भाजपमध्ये घरबसल्या तिकीट येते काँग्रेसमध्ये भीक मागावी लागते - हंसराज अहीरचंद्रपूर : भाजपामध्ये विकासकामे व पक्षनिष्ठेच्या आधारावर निवडणुकीची उमेदवारी मिळते तर काँग्रेसमध्ये भीक मागावी लागते, असा प्रहार भाजपा उमेदवार हंसराज अहीर यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेतून केला. मतदार संघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झालीत. या जोरावरच उमेदवारी दिली. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी नवी दिल्ली येथे जावून भाजपाचा ए.बी. फॉर्म आणला आणि तो आपणाला घरी आणून दिला. काँग्रेसच्या तिकीटासाठी दिल्लीत भीक मागावी लागते. भाजपमध्ये तिकीट घरी येते, अशा शब्दात अहीर यांनी काँग्रेसवर पलटवार केला. याप्रसंगी ना. मुनगंटीवार म्हणाले, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे १९५१-५२ कालखंडातील प्रश्न आजही पुढे करीत आहे. यात काँग्रेसचे यश की अपयश हे जनतेने ठरावे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात जातीवर आधारित मतदान होत नाही. जनता विकासावर मतदान करते. भाजपाचे हेच धोरण आहे असून आम्ही देशासाठी मत मागतो, असा टोलाही ना. मुनंगटीवार यांनी यावेळी हाणला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक