शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; ‘त्या’ १४ गावात दोन राज्यांची मतदान केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 15:41 IST

अनेक मतदार एकाचवेळी दोन्ही राज्यात मतदान करण्यासाठी सज्ज झाले असल्याचा प्रकार महाराष्ट्र - तेलंगणा सीमेवरील वादग्रस्त १४ गावात बघायला मिळत आहे.

ठळक मुद्देबंदोबस्तासाठीही दोन राज्यांचे पोलीस

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एका नागरिकाला एकावेळी एकदाच मतदान करण्याचा अधिकार असल्याचे सांगितले जाते. असे असले अनेक मतदार एकाचवेळी दोन्ही राज्यात मतदान करण्यासाठी सज्ज झाले असल्याचा प्रकार महाराष्ट्र - तेलंगणा सीमेवरील वादग्रस्त १४ गावात बघायला मिळत आहे. या १४ गावात तेलंगणा व महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र असणार आहे. विशेष म्हणजे, दोन्ही राज्याची निवडणूक ११ एप्रिललाच होत आहे.येत्या ११ एप्रिल रोजी लोकसभेच्या पहिल्या टप्प्याकरिता मतदान प्रक्रिया होणार आहे. सीमेवरील वादग्रस्त १४ गावे महाराष्ट्र शासनाचीच असल्याचा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही या वादग्रस्त गावात तेलंगणा राज्याची दादागिरी पाहायला मिळते. मागील काही महिन्यांपूर्वी या वादग्रस्त गावात महाराष्ट्र शासनाच्या ग्रामपंचायत व तेलंगणा शासनाच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. आता पुन्हा याच वादग्रस्त गावात दोन्ही राज्याच्या लोकसभा निवडणुका होत आहे. येथील नागरिक मात्र दोन्ही राज्यात मतदान करण्यासाठी सज्ज झाले आहे. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात या वादग्रस्त गावांमध्ये तेलंगणा शासनाच्या वतीने आसिफाबाद लोकसभेकरिता तर महाराष्ट्र शासनाकडून चंद्रपूर -वणी लोकसभेकरिता मतदान होणार आहे. निवडणूक जशी जवळ येत आहे, तसे या वादग्रस्त गावात प्रचाराचा वेग वाढत चालला आहे. एकाच दिवशी दोन्ही राज्याच्या निवडणुका गावात होणार असल्याने दोन्ही राज्याचे पोलीस बंदोबस्तसुध्दा मोठ्या प्रमाणात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकchandrapur-pcचंद्रपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019