शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

Lok Sabha Election 2019; काँग्रेस शेतकऱ्यांचे सरकार होऊच शकत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 22:11 IST

भाजपा सरकार हे गरीबांचे सरकार असून विरोधी असणारे ५६ पक्ष एकत्र येवून भाजपाला माघारी आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. काँग्रेस शेतकऱ्यांचे सरकार होवून शकत नाही. काँग्रेस राजवटीत शेतकऱ्यांसाठी येणारी मदत त्यांना मिळत नव्हती. ती शेवटच्या घटकापर्यंत पोहचत नव्हती, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे जिवती तालुक्यातील शेणगाव येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत केली.

ठळक मुद्देरावसाहेब दानवे : भाजपच्या प्रचारार्थ जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती(चंद्रपूर) : भाजपा सरकार हे गरीबांचे सरकार असून विरोधी असणारे ५६ पक्ष एकत्र येवून भाजपाला माघारी आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. काँग्रेस शेतकऱ्यांचे सरकार होवून शकत नाही. काँग्रेस राजवटीत शेतकऱ्यांसाठी येणारी मदत त्यांना मिळत नव्हती. ती शेवटच्या घटकापर्यंत पोहचत नव्हती, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे जिवती तालुक्यातील शेणगाव येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत केली.भाजपा राजवटीत शेवटच्या घटकापर्यंत पूर्णत: मदत पोहचत आहे. जिवती मधील वनजमिनीच्या पट्ट्याच्या विषयावर हे सरकार सकारात्मक आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी जिवती येथे बैठक लावून प्रश्न मार्गी लावणार असल्याचेही दानवे यांनी यावेळी नागरिकांना आश्वस्त केले. मंचावर युतीचे उमेदवार हंसराज अहीर, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष वनिता कानडे, शिवसेना उपपमुख पंढरी मस्कले, जि.प. सभापती गोदावरी केंद्रे, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष वाघूजी गेडाम, तालुका अध्यक्ष केशव गिरमाजी, पं.स. सभापती सुनील मडावी, उपसभापती महेश देवकते, नगराध्यक्षा पुष्पा नैताम, जिल्हा उपाध्यक्ष अरुण मस्की, शिवाजी सेलोकर, जि.प. सदस्य कमला राठोड, सतीश धोटे, अरुण मडावी, माणिक उपलेंचवार, दत्ता राठोड उपस्थिते होते.शेतकºयांच्या प्रकल्पबाधित होणाऱ्या जमिनींना वाढीव मोबदला मिळवून देण्यासाठी लोकसभेत विधायक लढा देवून अनेक उद्योगात अल्प दरात अधिग्रहीत होणाऱ्या जमिनींना खासदार हंसराज अहीर यांनी न्याय मिळवून देत मोठ्या प्रमाणात वाढीव मोबदला मिळवून दिला आहे. त्यांचे हे कार्य लोकसभेत अगदी जवळू बघत आलो आहे. जिवतीसारख्या अतिदुर्गम भागाचा विकास साधायचा अहीर यांना पुन्हा संधी द्यावी, असेही दानवे म्हणाले.