शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

Lok Sabha Election 2019; चंद्रपूर जिल्ह्यातील चिखलगाव-लाडजवासीयांचा मतदानावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 18:55 IST

ब्रह्मपुरी तालुक्यातील चिखलगाव व लाडज या दोन्ही गावांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधत लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. मात्र प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे या दोन्ही गावांनी आज गुरुवारी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला.

ठळक मुद्देप्रशासनाचे प्रयत्न निष्फळदोन गावातील पाच केंद्रांवर शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील चिखलगाव व लाडज या दोन्ही गावांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधत लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. मात्र प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे या दोन्ही गावांनी आज गुरुवारी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला. या गावांमधील तब्बल अडीच हजार मतदारांनी मतदान केले नाही. त्यामुळे या गावातील मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता.चिखलगाव या लाडज ही दोन्ही गावे वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. या दोन्ही गावाच्या दरम्यान वैनगंगाचे मोठे पात्र आहे. नदी पात्रावर पूल बांधण्याची मागणी या गावांनी अनेक वर्षांपासून केली आहे. मात्र याकडे शासनाने व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले असल्याने ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवरच बहिष्कार टाकला. उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार विद्यासागर चव्हाण व पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी गावकऱ्यांनी मतदान करावे, यासाठी वारंवार प्रयत्न केला. बैठकी घेतल्या. परंतु लोकप्रतिनिधीनी मात्र पूर्णत: दुर्लक्ष केल्याने गावकऱ्यांनी अखेर बहिष्काराचा पवित्रा कायम ठेवला. चिखलगाव केंद्र क्र. ४७, ४८ या केंद्रावर ८४०, ६२९ मतदान असून लाड क्र. ४६ या केंद्रावर ९६३ एवढे मतदान आहे. मात्र एकाही मतदाराने मतदान केले नाही. मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांची मने वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. गावकरी मतदान न करता आपल्या दैनंदिन कामाला निघून गेले.चिखलगाव येथील लोकांना समजावून सागितले. परंतु त्यांनी आमच्याकडे लक्ष दिले नाही. आपला बहिष्कार कायम ठेवला व आपल्या कामाला निघून गले.-प्रा. उमेश इंदूरकरकेंद्राध्यक्ष चिखलगाव केंद्र क्र. ४७लाडज या गावाला गेल्या २६ वर्षांपासून जाणे येणे करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. पूल-कम बंधारा बांधण्यासाठी आम्ही सातत्याने मागणी करीत आहोत. परंतु या मागणीकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकला.-भोजराज दुर्योधन नंदागवळीउपसरपंच, लाडज

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकchandrapur-pcचंद्रपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019