शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

लोहार डोंगरीवासीय विविध समस्यांनी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 23:23 IST

लोहार डोंगरी हे गाव ब्रह्मपुरी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर तसेच तळोधी (बा.) वनपरिक्षेत्राच्या अगदी टोकावर वसले आहे.

आॅनलाईन लोकमततळोधी (बा.): लोहार डोंगरी हे गाव ब्रह्मपुरी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर तसेच तळोधी (बा.) वनपरिक्षेत्राच्या अगदी टोकावर वसले आहे. मात्र, शासनाच्या विविध योजना अद्याप पोहोचल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.लोहार डोंगरी हे गाव किटाळी बोद्रा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येते. गावाची लोकसंख्या जेमतेम ५८ आहे. १२ घरांच्या या वसतिमध्ये नागरी सुविधांचा अभाव आहे. गावाला जाण्यासाठी मुख्य रस्ता नाही. नागरिकांना तळोधी (बा.) येथील जाण्याकरिता पायवाट रस्त्याचा आधार घ्यावा लागतो. वन्य प्राण्यांच्या संचारामुळे रात्री घराबाहेर निघणे शक्य होत नाही. गावाच्या सभोवताल घनदाट जंगल व्यापले आहे. लोहारडोंगरी गावात वाघ, चितळ, डुक्कर, अस्वल, हरीण आणि अन्य वन्यप्राण्यांचा सतत संचार सुरू असतो. प्रकृती बिघडल्यास आरोग्य सुविधेकरिता १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मेंडकी येथे जावे लागते. रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण झाले नाही. त्यामुळे पायी व सायकलीने जंगलातून वाट काढताना जीव मुठीत ठेवावा लागतो. पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. गावकरी एकाच बोरवेलमधून पाण्याची गरज भागवितात. उन्हाळ्यात भीषण टंचाई निर्माण होते. दोन विहिरी आहेत. पण, यंदा पाऊस कमी पडल्याने या विहिरींनी तळ गाठला.शासनाने गाव तिथे शाळा उघडल्या. परंतु येथे अजूनपर्यंत अंगणवाडीदेखील सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. किराणा दुकान नसल्याने जीवनाश्यक वस्तु मिळत नाही. तळोधी (बा.) येथे गेल्याशिवाय साधे मीठही विकत घेता येत नाही. लोहार डोंगरी गावापासून गंगासागर हेटी हे गाव तीन किलोमीटर आहे. या रस्त्याची दुरवस्था झाली असून नागरिकांचे हाल होतात.या मार्गावर रेल्वे प्रशासनाने एक बोगदा तयार केला. त्यातून पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे रस्त्यावर साचून राहते. चारही बाजूने जंगल असल्यामुळे नागरिकांच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.