आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : कराचा भरना न करणाऱ्या शासकीय कार्यालये व व्यापारी प्रतिष्ठानांविरुद्ध महानगरपालिकेने जप्तीची मोहीम हाती घेतली आहे. शनिवारी झोन क्रमांक १ अंतर्गत येणाऱ्या चार प्रतिष्ठांना कुलूप ठोकण्यात आले.मनपा हद्दीतील शासकीय कार्यालये व खासगी प्रतिष्ठानाकडे कोट्यवधी रूपयांचा कर थकीत आहे. थकबाकीदारांना मनपाने नोटीस बजावले. मात्र, तरीही कराचा भरणा केला नाही. त्यामुळे मनपाने जप्तीची धडक मोहीम हाती घेतली. शनिवारी झोन क्रमांक १ अंतर्गत येणाºया पिंक प्लॅनेट या प्रतिष्ठानावर जप्तीची कारवाई केली. पिंक प्लॅनेटच्या मालकाकडे ४ लाख ५१ हजार रुपयांचा कर थकीत आहे. याच मार्गावरील यंग व्यायाम शाळेकडे ९० हजार ७४२ रुपयांचा कर थकीत होता. मनपाचे अधिकारी या प्रतिष्ठानावर कारवाई करण्यासाठी धडकताच, त्यांनी कराचा भरणा केला. त्यानंतर मनपा अधिकाºयांनी आपला मोर्चा भुक्ता इमारतीकडे वळविला. भुक्ता या मालमत्ताधारकाकडे ३ लाख ९२ हजार रुपयांचा कर थकीत आहे. या मालमत्ताधारकाची दुकानाची चाळ आहे. येथे तीन दुकाने आहेत. ही तिन्ही दुकाने कारवाई दरम्यान बंद होती.मात्र कराचा भरणा करण्यास कुणीही तयार नसल्याने मनपा अधिकाऱ्यांनी या इमारतीमधील महिंद्रा कार्यालय, मारोती सुझुकी व प्रोव्हिन्शियल नावाने असलेल्या तिन्ही दुकानांना सील ठोकले. मनपा क्षेत्रातील मालमत्ता धारकांने शासकीय कराचा वेळेवर भरणा करून मनपाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
थकबाकीदार प्रतिष्ठानांना मनपाने ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:18 IST
कराचा भरना न करणाऱ्या शासकीय कार्यालये व व्यापारी प्रतिष्ठानांविरुद्ध महानगरपालिकेने जप्तीची मोहीम हाती घेतली आहे.
थकबाकीदार प्रतिष्ठानांना मनपाने ठोकले कुलूप
ठळक मुद्देपथकाची कारवाई : कर भरण्याचे आवाहन