शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

गावकऱ्यांनी ठोकले आरोग्य केंद्राला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 22:57 IST

चिरोली येथील उध्दव शेंडे या युवकावर चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात योग्य उपचार न झाल्याने त्याला मूल येथे नेताना वाटेतच मृत्यू झाला. यामुळे संतप्त नागरिकांनी चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले. ही घटना मंगळवारी घडली.

ठळक मुद्देचिरोली येथील घटना : रुग्णांच्या मृत्यूने गावकरी संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : चिरोली येथील उध्दव शेंडे या युवकावर चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात योग्य उपचार न झाल्याने त्याला मूल येथे नेताना वाटेतच मृत्यू झाला. यामुळे संतप्त नागरिकांनी चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले. ही घटना मंगळवारी घडली.मूल तालुक्यातील चिरोली येथील उद्धव शेंडे यांना मागील काही दिवसांपासून अस्थमाचा त्रास सुरु झाला. त्यामुळे तो चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत होता. दरम्यान, मंगळवारी दुपारी ११ वाजता त्यांना जास्त त्रास जाणवत असल्याने ते प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेले.दरम्यान, वैद्यकीय अधिकारी डॉ. बिना आयलनवार यांनी रूग्णावर उपचार करून मूल येथे रेफर केले. परंतु, त्रास जास्त असल्याने व चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रूग्णाला आॅटोने मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात नेताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त नागरिक रुग्णालयात जाब विचारण्यासाठी गेले. मात्र रुग्णालयात डॉक्टर किंवा कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्याने संतप्त नागरिकांनी रुग्णालयाला कुलूप ठोकले.डॉक्टरांचा मुख्यालयाला खोचिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रायपूरे यांच्याकडे प्रशासकीय व वित्त कामाचा प्रभार असून भगवानपूर येथील उपकेंद्राचाही अतिरिक्त प्रभार आहे. तर वैद्यकीय अधिकारी डॉ. बिना आयलनवार, डॉ. कोमल मेश्राम, डॉ. देवगडे यांचीही याठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र डॉ. कोमल मेश्राम यांना मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे. उर्वरीत डॉक्टरही मुख्यालयी राहत नसल्याने रुग्णांची हेळसांड होते. त्यामुळे डॉक्टरांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करावे, अशी मागणी सरपंच कविता सुरमवार यांनी केली.