शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

चंद्रपुरात पुन्हा लॉकडाऊन कडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 05:01 IST

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी किंवा कोरोना आजाराचे लक्षणे जाण्यासाठी ७ ते १० दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळेच हा दहा दिवसांचा टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातही ही एखाद्या या व्यक्तीला कोरोना संक्रमण झाले असल्यास पहिल्या चार ते पाच दिवसांमध्ये लक्षणे दिसायला लागतात. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पाच दिवसांचा लॉकडाऊन कडकडीत करण्यात आला.

ठळक मुद्देपोलिसांचा चोख बंदोबस्त : ऊर्जानगर, दुर्गापुरातही कडक अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : कोरोनाचा संसर्ग होवू नये, यासाठी प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असतानाही जिल्ह्यात गुरूवारपर्यंत कोरोना रूग्णांची संख्या २२८ झाली. त्यातील ६२ रूग्ण चंद्रपूर शहरातील आहेत. त्यामुळे धास्तावलेल्या प्रशासनाने चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्र तसेच ऊर्जानगर व दुर्गापूर ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारपासून रविवारी २६ जुलैपर्यंत १० दिवस कडक लॉकडाऊन लागू केले. परिणामी, गजबजणारे रस्ते पुन्हा निर्मनुष्य झाले आहेत. बाजारपेठा सुन्यासुन्या झाल्या. शहरातील चौकाचौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दहा दिवसांचा हा लॉकडाऊन दोन टप्प्यात विभागण्यात आला आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी किंवा कोरोना आजाराचे लक्षणे जाण्यासाठी ७ ते १० दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळेच हा दहा दिवसांचा टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातही ही एखाद्या या व्यक्तीला कोरोना संक्रमण झाले असल्यास पहिल्या चार ते पाच दिवसांमध्ये लक्षणे दिसायला लागतात. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पाच दिवसांचा लॉकडाऊन कडकडीत करण्यात आला. जिल्ह्यात १० दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या अचानक २०० पर्यंत पोहोचली. आता तर दिवसागणिक १० ते १२ पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे १० दिवसांचे कडक लॉकडाऊन करण्यात आले.सर्व दुकाने कडकडीत बंदजिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार १७ ते २१ जुलै या पहिल्या पाच दिवसात चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्र, ऊर्जानगर व दुर्गापुरातील सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद कडकडीत बंद ठेवण्यात आली. २१ ते २६ जुलै कालावधीत पुढील पाच दिवसांसाठी केवळ अत्यावश्यक व खाद्य वस्तूंची पुरवठा करणारी दुकाने, थोक विके्रते, जसे खाद्य पदार्थ, किराणा, दूध दुग्धजन्य पदार्थ, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस,मासे, बेकरी, पशुखाद्य, कृषीविषयक दुकाने सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे फेरीवाले, भाजीविक्रेते, फळविक्रेत्यांसह सर्व व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवल्याचे शुक्रवारी दिसून आले.शेतमालावर पुन्हा कुऱ्हाडशहरातील सर्व हॉटेल्स घरपोच सुविधा आज बंद होती. २१ ते २६ जुलै या कालावधीत केवळ घरपोच सेवा सुरू राहणार आहे. भाजीपाला नाशवंत असल्याने दररोजविक्री करावीच लागते. मात्र, आजपासून पाच दिवस भाजीपाला विक्री बंद शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहेनागरिकांनी घरीच राहणे केले पसंतगेले दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली असताना आजपासून लॉकडाऊन सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गुरूवारी जीवनावश्यक वस्तुंची खरेदी केली. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी झुंबळ उडाली होती. नागरिकांनी आज घरीच राहणे पसंत केले.मनपाकडून अ‍ॅन्टिजेन टेस्ट मोहीमकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन सुरू होताच महानगर पालिकेकडून आरोग्य तपासणी मोहीम सुरू झाली. या कालावधीत काळातील दहा दिवसांमध्ये आरोग्य कर्मचारी घरोघरी जावून सर्वेक्षण करणार आहेत. कोरोना संसर्गाची तात्काळ माहिती देणाºया अ‍ॅन्टिजेन तपासणीचा यावेळी सर्वाधिक वापर केल्या जाणार आहे.फक्त मेडिकल स्टोअर्स सुरूजिल्हा प्रशासनाने सर्व मेडिकल स्टोअर्स सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजतापर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे आज चंद्रपूर शहर व दुर्गापुरातील सर्व मेडिकल स्टोअर्स सुरू होते.ऊर्जानगर, दुर्गापुरात शुकशुकाटकोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू झाल्याने ऊर्जानगर व दुर्गापुरात शुकशुकाट पसरला होता. जीवनाश्यक वस्तुंची सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. ऊर्जानगर व दुर्गापूर चौकात दररोज अनुभवाला येणारी कामगारांची गर्दी व वाहतूककोंडी आढळून आली नाही.शासकीय कार्यालये, खासगी हॉस्पिटल सुरूआज सकाळी सहा ते दहा वाजतापर्यंत काही विक्रेते घरपोच दूध वितरण केल्याचे दिसून आले. सर्व खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, न्यायालय, राज्य व केंद्र शासन, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये सुरू होती.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या