शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

महिला बचत गटांना शून्य दराने कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2017 00:32 IST

पदराच्या गाठीला पैसा जमवण्याचा व कुटुंबाला आवश्यक असताना खर्च करण्याचे कौशल्य बाळगणाऱ्या महिलांची आर्थिक आघाडीवरील पत वाढली आहे.

पंकजा मुंडे : पोंभुर्णा येथे महिला बचतगट मेळावाचंद्र्रपूर : पदराच्या गाठीला पैसा जमवण्याचा व कुटुंबाला आवश्यक असताना खर्च करण्याचे कौशल्य बाळगणाऱ्या महिलांची आर्थिक आघाडीवरील पत वाढली आहे. महिला कधीच कोणाचे कर्ज अंगणावर ठेवत नाही. यापुढे राज्य शासनाकडे महिला बचत गटांना शून्य टक्के दराने विनाअट कर्ज देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी पोंभुर्णा येथे केले. महिला आर्थिक विकास मंडळ व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पोंभूर्ण्याच्या कार्यक्रमात उभय नेते सहभागी झाले होते.यावेळी राज्याचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभूर्ण्याच्या महिला बचत गटाची चळवळ राष्ट्रीयस्तरावर पोहचविण्याचे आवाहन केले.यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, नगरपंचायत अध्यक्ष गजानन गोरंटीवार, पंचायत समिती सभापती अल्काताई आत्राम, उपसभापती विनोद देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष राहुल संतोषवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, हरीष शर्मा, चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी एम.आर.दयानिधी, वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी नरेश उगेमुगे, बचत गटाची चळवळ राबविणा-या आशा भडके आदी उपस्थित होते.यावेळी अध्यक्षीय भाषणात पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले की, या छोटयाशा तालुक्यामध्ये बचत गटाच्या माध्यमातून फार मोठे काम सुरु आहे. त्याची दखल मी घेतली असून महिला बचत गटांनी कुक्कुट पालन, दुग्ध व्यवसाय आदी व्यवसाय करावे, याकरिता आवश्यक तेवढी मदत केली जाईल. पुढच्या पाच वर्षांत पोंभुर्णा तालुक्यातील महिला बचत गटाच्या महिला आर्थिक दृष्टया सक्षम व कर्त्या महिला बनतील, अशी मी आशा करतो. त्यांना पुरुषापुढे पैशासाठी हात पसरावा लागणार नाही, इतकी आर्थिक सक्षमता त्यांच्यात येईल, अशी मला अपेक्षा आहे.हा तालुकयावेळी महिला बचत गटामध्ये काम करणा-या सक्रिय महिला सदस्यांच्या पतींचा ‘ज्योतीबांचा सत्कार’ म्हणून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात वेगवेगळया जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या महिला बचत गटांच्या सदस्या, आदिवासी गावातील महिला सरपंच व लक्ष्मीकांत भडके, कविता मडावी, सुलभा जुन्नावार, अरविना दुतकोवर, नीलम इटकलवार, सुमित्रा जुमनाके, उर्मिला मार्गोनवार यांचाही सत्कार करण्यात आला.(प्रतिनिधी)