शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

पशुधन पर्यवेक्षकांचे असहकार आंदोलन सुरू

By admin | Updated: June 26, 2014 23:09 IST

पशुवैद्यकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी १० जून पासून पशुचिकित्सक व्यवसायी संघटनेने बेमुदत अहवाल बंद व असहकाय आंदोलन पुकारल्यामुळे सेवा सुरु असली तरी, शासकीय पातळीवरील कागदपत्रे पूर्ण होत

चंद्रपूर : पशुवैद्यकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी १० जून पासून पशुचिकित्सक व्यवसायी संघटनेने बेमुदत अहवाल बंद व असहकाय आंदोलन पुकारल्यामुळे सेवा सुरु असली तरी, शासकीय पातळीवरील कागदपत्रे पूर्ण होत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. शासनाने आमच्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्या, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान, आता पावसाळा सुरु झाला. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये गावागावात जनावरांच्या आरोग्यांचा प्रश्न उभा ठाकणार आहे.संघटनेच्या मागण्यांमध्ये पशुधन विकास अधिकारी गट ब सेवाभरती नियम दुरुस्त करावा, पशुधन विकास अधिकारी गट ब यांच्या स्थानश्चिचीबाबत निर्णय घ्यावा, ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांच्या धरतीवर संवर्गातील कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनातुन कायम प्रवास भत्ता मंजुर करावा, जिल्हा परिषदेच्या सुधारित आकृती बंधातील तालुकास्तरारील सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यांबदल निर्णय घ्यावा, ३५१ पदे सहाय्यक गटविकास अधिकारी संवर्गातील समर्पीत करण्यात आली. सदर पदे संवर्गास पुर्ववत परत करावी, पदविका व प्रमाणपत्र धारकांची अहर्ता भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ च्या पहिल्या अनुसूचित समाविष्ट करावा, पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांना बेकायदेशीरपणे देण्यात आलेले पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ चे कार्यभार त्वरित काढून घ्यावा आदी मागण्या करण्यात आल्या. आंदोलनामध्ये संस्थेवरील तांत्रिक व इतर कोणत्याही कामाचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येत नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. संघनेतर्फे कोणत्याही प्रकारची शासनाने पुरविलेली लस, औषध स्विकारणार नसून, कार्यक्षेत्रात कोणत्याही प्रकारचे लसिकरण करण्यात येणार नसल्याचे संघटनेने शासनाला कळविले आले आहे. दरम्यान, कामधेनु, दत्तक ग्राम योजना, नाविण्यपुर्ण योजना, अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम या सर्व योजनांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. हजेरीपट वगळता इतर कोणतीही रेकार्ड, तपासणीसाठी वरिष्ठांना उपलब्ध करून देण्यात येणार नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. यासंदर्भात संबंधितांना निवेदन सुद्धा देण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)