शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
7
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
8
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
9
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
10
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
11
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
12
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
13
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
14
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
15
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
16
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
17
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
18
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
19
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
20
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!

गावकऱ्यांची एकजूट ठरली शेतकऱ्यासाठी जीवदान !

By admin | Updated: March 17, 2017 00:52 IST

तालुक्यातील केळी येथील एका सधन कास्तकाराचे २०० क्विंटल कापूस केवळ गावकऱ्यांनी दाखविलेल्या एकजुटीच्या प्रयत्नामुळे

केळी येथील घटना : कापसाची गंजी आगीपासून बचावली वरोरा : तालुक्यातील केळी येथील एका सधन कास्तकाराचे २०० क्विंटल कापूस केवळ गावकऱ्यांनी दाखविलेल्या एकजुटीच्या प्रयत्नामुळे आगीपासून वाचले. ही घटना १० मार्चच्या रात्री घडली. केळी येथील कास्तकार राजू पाटील झापर्डे यांच्या घरात २०० क्विंटल कापसाची गंजी होती. भाव कमी असल्यामुळे त्यांनी कापूस विकला नव्हता. घरात असलेल्या गंजीतून रात्री अचानक धूर निघत असल्याचे राजू पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. गावकऱ्यांना ही वार्ता कळताच सर्व नागरिक त्यांच्या मदतीला धावून आले. केळी हे गाव चंद्रपूर जिल्ह्यात येत असले तरी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पासून अगदी १८ किमी अंतरावर आहे. नागरिकांनी अग्निशमन विभागाला सूचना दिली व गावकऱ्यांनी आग विझविण्याचे प्रयत्न सुरुच ठेवले. गावकऱ्यांनी शेकडो क्विंटल कापूस आगीपासून वाचविला. यानंतर आलेल्या अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवले. तरी या आगीत शेतकऱ्याचे ८ लाखांचे नुकसान झाले; मात्र मोठी हानी टळली. रात्रीला ही घटना कळताच काँग्रेसचे नेते डॉ. विजय देवतळे व डॉ. आसावरी देवतळे, वसंतराव विधाते गुणवंत भोयर, बंडू टीपले, साईनाथ टोंगे, संजय महाजन, किशोर भलमे, साळवे, भारत घुबडे, शाम बलखंडे, विकास डांगरे, बंडू गोल्हर, वरोरा तहसीलदार आणि तलाठी यांनी घटनास्थळाला भेट देऊन राजू झापर्डे यांचे सांत्वन केले. या घटनेमुळे ‘गाव करी ते राव ना करी’ या म्हणीचा प्रत्यय आला. (तालुका प्रतिनिधी)