शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

साहित्यिकांची लेखनी ठरत आहेत जनजागृतीचे माध्यम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:21 IST

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात फिनिक्स साहित्य मंच, चंद्रपूर व पंचायत समिती गोंडपिपरीद्वारा जिल्ह्यातील ...

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात फिनिक्स साहित्य मंच, चंद्रपूर व पंचायत समिती गोंडपिपरीद्वारा जिल्ह्यातील लेखक, कवींना कोरोना जनजागृतीसाठी लिहिते केले. साहित्यिकांचे शब्दांना जनजागृतीचे माध्यम बनविले. ‘संदेश कोरोना लसीकरणाचा’ या शीर्षकाखाली तीन ऑनलाइन कविसंमेलने पार पाडली. समाजमाध्यमातून कवितांना व्यापक प्रसिद्धी देऊन जिल्ह्यातील कवी, लेखकांना कोरोना योद्ध्याची भूमिका देऊन जनजागृती करवून घेतली.

सहा.गटविकास अधिकारी धनंजय साळवे, फिनिक्स साहित्य मंचाचे अध्यक्ष नरेशकुमार बोरीकर, विजय वाटेकर यांनी ‘आरोग्यावर बोलू काही’ या कोरोनाविरुद्ध एकूण ५२ जनजागृतीच्या कवितांचे संपादन पुस्तक रूपात केले. कोरोना लसीकरणाबाबत नागरिकांत जनजागृती व्हावी, यासाठी नुकतेच ‘पुन्हा श्वास घेण्यासाठी’ या १९ कविंच्या कवितांचे पुस्तकरूपाने फिनिक्सतर्फे कवी धनंजय साळवे, नरेशकुमार बोरीकर, अविनाश पोईनकर, गोपाल शिरपूरकर यांनी संपादन केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपील कलोडे, गटविकास अधिकारी शेषराव बुलकुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमचंद कन्नाके यांनी साहित्याद्वारे सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

जिल्ह्यातील कवी सुरेंद्र इंगळे, संतोषकुमार उईके, जयवंत वानखेडे, मिलेश साकुरकर, सुनील बावणे, अरुण घोरपडे, पंडित लोंढे, राजेंद्र घोटकर, नरेंद्र कन्नाके, राजेंद्र पोईनकर, सुधाकर कन्नाके, संभाशिव गावंडे, बी.सी.नगराळे, शीतल धर्मपुरीवार, रोशनकुमार पिलेवान, प्रदीप देशमुख, किशोर चलाख, अरुण झगडकर, दुशांत निमकर, मीना बंडावार, प्रवीण आडेकर, दीपक शीव, अमित महाजनवार, नितीन जुलमे, सुनील कोवे, सुनील पोटे, वैशाली दीक्षित, चंद्रशेखर कानकाटे, ईश्वर टापरे यांनी कोरोना जनजागृती व लसीकरणासाठी लेखन करून योगदान दिले आहे.

कोट

सध्याच्या काळात जिल्ह्यातील कवी, लेखकांची लेखणी कोरोना निर्मूलन व लसीकरणासाठी जनजागृतीचे प्रभावी माध्यम असून, यातून जनतेतील गैरसमज दूर होऊन आशावाद निर्माण होईल. या उपक्रमातील कविता व संपादित पुस्तके समाजाला प्रेरणादायी व दिशादर्शक आहे.

- धनंजय साळवे

संयोजक तथा सहा.गट विकास अधिकारी, गोंडपिपरी