शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

पाण्याच्या बाटलीखाली दारूची तस्करी, चार जण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:36 IST

वरोरा : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असतानासुद्धा अवैध दारू विक्रेते नवनवीन शक्कल लढवून अवैध दारू मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पुरवठा करीत ...

वरोरा : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असतानासुद्धा अवैध दारू विक्रेते नवनवीन शक्कल लढवून अवैध दारू मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पुरवठा करीत आहेत. वरोरा पोलिसांनी बुधवारी एका कारवाईत २९ लाख ९६ हजार रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल जप्त केला.

नागपूरवरून खांबाडा मार्गे एक चार चाकी वाहन आणि त्याच्या समोर पायलटिंग करणारी एक कार चंद्रपूरकडे दारूसाठा नेत असल्याची माहिती वरोरा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी खंबाडा चेक पोस्ट गाठले आणि त्या ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांसह नाकाबंदी केली असता सर्वप्रथम हुंडाई कंपनीची कार क्रमांक एम. एच. ४९ बिके ३०३५ समोरून येताना दिसली. पोलिसांनी ते वाहन अडविले आणि त्याची तपासणी केली असता कार चालक नीलेश सुखदेव सलोटे याच्यासह कारमधून एक लाख रुपये नगदी आणि महागडे मोबाइल ताब्यात घेतले.

त्यापाठोपाठ लेलँड कंपनीचे चार चाकी वाहन क्रमांक एमएच ०४ एटी २७०४ पोलिसांना येताना दिसले. त्या वाहनाची तपासणी केली असता वरच्या भागात बिसलेरी पाण्याच्या बाटल्या तर आतमध्ये देशी दारूने भरलेल्या १५० पेट्या पोलिसांना आढळल्या. बिसलेरी बाटल्यांचा देखावा करून ही अवैध दारू आरोपी चंद्रपूरकडे नेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी या प्रकरणी राहील सलीम खान पठाण, शेख जुबेर शेख गुलाल आणि रंजीत चंद्रमणी मेश्राम (सर्व राहणार नागपूर) यांना अटक केली. पोलिसांनी या प्रकरणी ८ लाख ७० हजार रुपयांची दारू व मुद्देमालासह २९ लाख ९६ हजार रुपयांचा माल जप्त केला.

पोलीस हवालदार प्रदीप पाटील यांनी फिर्याद नोंदवली, तर उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, प्रदीप पाटील आणि इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

बाॅक्स

दारू मालकाचे नाव लपविण्यासाठी पोलिसांचे हात ओले?

ही दारू चंद्रपुरातील एका बड्या नेत्याची असल्याची चर्चा दारू पकडल्यानंतर सुरू झाली. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. ही दारू ते चंद्रपूरला घेऊन जात असल्याचे सांगत आहेत. ही दारू कोणाकडे चालली हेदेखील वरोरा पोलिसांना माहिती असताना पोलीस दारू मालकाचे नाव लपवित असल्याचे समजते. नाव लपविण्यासाठी वरोरा पोलिसांचे हात ओले केल्याची चर्चा आहे.