शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दारूविक्रेत्या उमेदवाराला विरोध करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:36 IST

श्रमिक एल्गार संघटना मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीच्या कडक अंमलबजावणी तसेच यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करावी या मागणीसाठी प्रयत्न करीत असताना आता चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत एका दारूविक्रेत्या उमेदवाराचाही कडाडून विरोध केला जाईल.

ठळक मुद्देश्रमिक एल्गारची माहिती : कॉर्नर सभा घेऊन करणार उमेदवाराविरुद्ध प्रचार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : श्रमिक एल्गार संघटना मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीच्या कडक अंमलबजावणी तसेच यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करावी या मागणीसाठी प्रयत्न करीत असताना आता चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत एका दारूविक्रेत्या उमेदवाराचाही कडाडून विरोध केला जाईल. यवतमाळ जिल्ह्यामध्ये दारूबंदीसाठी आंदोलन सुरू असताना एक दारुविक्रेता उमेदवार रिंगणात आहे. ही बाब महिलांसाठी अपमानास्पद आहे. त्यामुळे आता गावागावात कार्नर सभा घेऊन या दारूविक्रेत्या उमेदवाराविरुध्द श्रमिक एल्गार संघटना प्रचार करेल, अशी माहिती श्रमिक एल्गारच्या संस्थापक तसेच चंद्रपूर जिल्हा दारूबंदी समितीच्या अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी, तसेच यवतमाळ येथील स्वामीनी दारूबंदी समितीचे महेश पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.मुख्यमंत्र्यांनी दारूबंदीसंदर्भात कडक कायदे करण्याचे दिलेले आश्वासन पाळले नाही, तर पुन्हा १५ आॅगस्टपासून जेलभरो आंदोलनाचे हत्यार उपसणार, असा इशाराही यावेळी देण्यात आला.चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी झाली. मात्र कडक अंबलबजावणी होत नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. जून महिन्यामध्ये होणाऱ्या अधिवेशनात दारूबंदीच्या अंमलबजावणीसाठी कडक कायदे करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दारूबंदीसाठी निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून दारूबंदी संदर्भात प्रस्ताव शासन सादर करेल, असेही आश्वासन दिले. दरम्यान, जूनमध्ये मुख्यमंत्र्यांनी आश्वासन न पाळल्यास १५ आॅगस्टपासून पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपासणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. विशेष म्हणजे, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दारूबंदीसह अन्य मागण्या मान्य असून पुढील काळात त्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याचे अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने दारूबंदीसंदर्भात ठोस आश्वासन दिले नाही. एवढेच नाही, तर काही दिवसांपूर्वी चंद्रपुरात अ‍ॅड. प्रकाश आंंबेडकरांची सभा झाली. यामध्ये त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नसल्याने त्यांच्या पार्टीचा विचारच केला नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.दरम्यान, चंद्रपूर श्रमिक एल्गारने गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील उमेदवारासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नसून श्रमिक एल्गारचे सदस्य आपल्या सदसद्विवेकबुद्धीने उमेदवारांना मतदार करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याचवेळी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील भाजपा उमेदवाराच्या कोणत्याही सभा, बैठकांमध्ये आपण तसेच सदस्य जाणार नाही. मात्र कार्नर सभा घेऊन जमेल तसा दारुविक्रेत्या उमेदवाराविरुद्ध प्रचार करू, असेही अ‍ॅड. गोस्वामी यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक