शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता

By admin | Updated: February 29, 2016 00:33 IST

बीजीआर कंपनीच्या वजन काट्यावर झालेल्या प्रत्यक्ष वजनाहून दोन टन अधिक भंगार चोरुन नेत असताना...

ट्रकचालकास अटक : बीजीआरमधील भंगार चोरी प्रकरणदुर्गापूर: बीजीआर कंपनीच्या वजन काट्यावर झालेल्या प्रत्यक्ष वजनाहून दोन टन अधिक भंगार चोरुन नेत असताना या कंपनीतील स्क्रॅपचा लिलाव मिळालेल्या स्क्रॅप मर्चंन्टच्या एका ट्रकला शनिवारी दुर्गापूर पोलिसांनी पकडले. यात मुद्देमालासह चालकास अटक करण्यात आली आहे. हा प्रकरा केव्हापासून सुरू आहे व यात किती जण गुंतले आहेत, याची चौकशी केली जात असून मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.वीज केंद्राच्या विस्तारित प्रकल्पात कार्यरत बीजीआर या कंत्राटी कंपनीने त्यांच्याकडे असलेल्या स्क्रॅपचा लिलाव केला. सर्वाधिक बोली बोलणाऱ्या तामिळनाडूतील एका स्क्रॅप मर्चन्टला हा लिलाव मिळाला. बीजीआर कंपनीत लिलाव केलेल्या स्क्रॅपव्यतिरिक्त शेकडो टन स्क्रॅप त्यांच्या परिसरात विखुरला आहे. बीजीआर कंपनीला अंधारात ठेवून येथे कार्यरत अधिकाऱ्यांनी आपसात संगनमत साधून मोजक्याच स्क्रॅपचा लिलाव केला. त्यानुसार स्क्रॅप मर्चंन्टने येथील स्क्रॅप नेणे सुरु केले. यामध्ये सावळागोंधळ होत असल्याची दुर्गापूर पोलिसांना गुप्त माहिती होती. या गैरप्रकारावर येथील ठाणेदार आर. के. सिंगनजुडे यांनी पाळत ठेवून शनिवारी स्क्रॅप घेऊन निघालेल्या ट्रक टी.एन. २९/एएम- ०९८५ ला पकडले. त्यात प्रत्यक्ष वजनाच्या दोन टन स्क्रॅप अधिक असल्याचे आढळून आले.दुर्गापूर पोलिसांनी फौजदारी कायद्याच्या कलम ४१ (१) ड व मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १२४ नुसार ट्रक जप्त करुन चालक के. अय्यप्पन पी. कलीया पेरुमला (२६) रा. तामिळनाडू याला अटक केली आहे. सदर प्रकरणाचा सखोल तपास येथील पोलीस उपनिरीक्षक कावडे करीत आहे. या प्रकरणात सहभागी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय म्हणजे केंद्रीय सुरक्षा दल येथे लवकरच दाखल होणार आहे. त्याआधी हा सावळागोंधळ आटोपण्याचाही बीजीआरच्या येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा डाव असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. (वार्ताहर)