शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा लपंडावाने नागरिक त्रस्त

By admin | Updated: June 1, 2017 01:36 IST

राजुरा तालुक्यातील देवाडासह परिसरातील ग्रामस्थ विजेच्या लंपडावाने कमालीचे हैराण झाले आहेत.

देवाडा परिसर : तक्रार करूनही दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क देवाडा : राजुरा तालुक्यातील देवाडासह परिसरातील ग्रामस्थ विजेच्या लंपडावाने कमालीचे हैराण झाले आहेत. याबाबत वारंवार तक्रार करूनही वीज वितरण कंपनी ही बाब गांभीर्याने घेत नसल्याने नागरिकांमध्ये वीज वितरण कंपनीविषयी रोष व्यक्त होत आहे. मागील काही दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडीत होणे, विद्युत दाब अचानक कमी जास्त होणे, भारनियमनच्या नावाखाली वीज पुवठा खंडीत करणे, यासारखे प्रकार नेहमीचेच झाले आहेत. अलिकडच्या काही दिवसांपासुन कधी दिवसभर तर कधी रात्रभर वीज पुरवठा खंडीत असतो. चुकून एखादे वेळी वीज पुरवठा सुरू झाला तर तो पुन्हा कधी खंडीत होईल याचा अंदाजही नसतो. अचानक विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने व विद्युत दाब अचानक कमी-जास्त होत असल्याने विजेवर चालणाऱ्या उपकरणात विघाड होत आहे.पुरेसा वीज पुरवठा मिळत नसल्याने पीठ गिरणी बंद राहते, त्यामुळे महिला वर्गाला कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. घरची कामे मजुरी व शेतीची कामे सोडून धान्य दळून आणण्यासाठी पीठ गिरणीवर चकरा माराव्या लागतात तसेच आजच्या काळात सर्व दाखले हे आॅनलाईन पद्धतीने मिळतात. मात्र वीज पुरवठा खंडीत राहत असल्याने प्रमाणपत्रासाठी चकरा माराव्या लागतात. ३३ के.व्ही सबस्टेशनची मागणी देवाडासह परिसरातील विद्युतधारकांची वाढती संख्या आणि गरज लक्षात घेता, येथे ३३ केव्ही सबस्टेशन देण्याची मागणी नागरिकांनी अनेकदा केली. मात्र याकडे आतापर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी किंवा अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या वेळी आश्वासनाची खैरात करणारेही निवडणूक झाल्याबरोबर आश्वासन विसरले. देवाडासारख्या मोठ्या गावात सहायक अभियंता कार्यालय सुरू करावे. जेनेकरून स्थानिक पातळीवर समस्या सोडविता येतील. वीज उपकरणे धोक्यात वेळी अवेळी वीज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे याचा विपरीत परिणाम विजेवर चालणाऱ्या उपकरणावर होत आहे. यामुळे अनेकांच्या टीव्ही, फ्र ीज, कुलर, पंखा, झेराक्स मशीन, बोरवेलचे मीटर कॉम्युटर मध्ये विघाड येत आहे. महावितणच्या वरिष्ट अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.