शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मातीचे ढिगारे उठले प्रकल्पग्रस्त गावांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:22 IST

कोळसा खननानंतर वेकोलिने टाकलेल्या मातीच्या महाकाय ढिगाऱ्याला नदी, नाल्यातील पाण्याचा प्रवाह अडून वेकोलि खाण परिसरातील शेकडो हेक्टर शेती पावसाळ्यात पाण्याखाली येते.

ठळक मुद्देमहाकाय ढिगारे : वेकोलि परिसरातील गावांना बॅक वॉटरचा फटका

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : कोळसा खननानंतर वेकोलिने टाकलेल्या मातीच्या महाकाय ढिगाऱ्याला नदी, नाल्यातील पाण्याचा प्रवाह अडून वेकोलि खाण परिसरातील शेकडो हेक्टर शेती पावसाळ्यात पाण्याखाली येते. मागील आठवड्यात एका दिवसाच्या पावसाच्या पाण्याने नाल्यात टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्याला पाणी अडल्याने पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र गेल्या २५ वर्षापासून वेकोलि प्रशासन प्रकल्पग्रस्त गावांवर अन्याय करीत असताना जबाबदार स्थानिक लोकप्रतिनिधींच्या ही बाब लक्षात का येत नाही, असा केविलवाणा प्रश्न आता प्रकल्पग्रस्त गावकरी विचारत आहे.राजुरा तालुक्यात बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाºया वेकोलिच्या कोळसा खाणींचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. कोळसा उत्खनानंतर वेकोलिने मातीचे महाकाय ढिगारे नदी, नाल्याच्या अगदी किनाºयावर टाकले आहे तर कुठे वेकोलिने माती टाकून नाल्याचा नैसर्गिक पाण्याचा प्रवाहच बंद केला. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात मातीच्या ढिगाºयाला पाण्याचा प्रवाह अडून अनेकदा गोवरी, सास्ती व परिसरातील गावांना बॅक वॉटरचा फटका बसून क्षणार्धात पुरपरिस्थिती निर्माण झाल्याने अकेक संसार उघडयावर आल्याचे प्रकल्पग्रस्त गावकºयांनी उघड्या डोळ्यांनी बघितले आहे. मागील आठवड्यात आलेल्या एका दिवसाच्या पावसाने मातीच्या ढिगाºयाला पाण्याचा प्रवाह अडून पुरस्थिती निर्माण झाली होती. याबाबतचे वृत्तही लोकमतने प्रकाशित करुन वेकोलि प्रशासनाचे लक्ष वेधले होते. वेकोलिने नैसर्गिक जिवंत नाले अपाल्या सोईनुसार वळविल्याने पावसाळ्यात पाणी गोवरी, सास्ती, पोवनी गावाच्या दिशेने लवकर फेकले जाते. त्यामुळे या पाण्यामुळे शेकडो हेक्टर शेती क्षणार्धात पाण्याखाली येते. शेतीचे असे प्रचंड नुकसान होत असताना स्थानिक लोकप्रतिनिधी वेकोलिला जाब का विचारत नाही, हा येथील शेतकºयांचा सवाल आहे.वेकोलिच्या कोळसा खाणी वर्धा नदी परिसरात वाटत चालल्याने गावकºयांना केव्हाही पुराचा मोठा होऊ शकतो. मात्र याकडे वेकोलिने मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले आहे. वेकोलिने वर्षाकाठी करोडो रुपयांचा नफा कमवायचा व गावकºयांनी वेकोलिचे दूष्परीणाम वर्षानुवर्ष सहन करीत राहायचे, असा येथील अलिखित नियमच बनला आहे. गावकºयांनी जीवन-मरणाचा हा संघर्ष कुठपर्यंत सहन करायचा, याचे उत्तर अजूनही कुणालाच शोधता आले नाही. ही खरी शोकांतिका आहे. वेकोलिने केलेल्या कर्माचे भोग वेकोलिच्या कुशीत वसलेल्या गावांना सहन करावे लागतात. गावकºयांची ही होरपळ आता सर्वांनाच सहन होत नाही. परंतु वेकोलिच्या मुजोर प्रशासनासमोर गावकरी हतबल आहे. गावकºयांनी अनेकदा निवेदन देऊन वेकोलिला उपाययोजना करण्यास सांगितले. मात्र वेकोलिच्या जबाबदार अधिकाºयांनी याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले.नियमांना डावलून उभे केले मातीचे ढिगारेपर्यावरणाला धोका होऊ नये म्हणून मातीचे ढिगारे कुठे व किती उंचावर असावे, याचे काही नियम वेकोलिला आखून दिले आहे. मात्र वेकोलि प्रशासनाने सर्रास नियमांना तिजांजली देत नदी, नाल्याचा अगदी काठावर मातीचे महाकाय ढिगारे टाकले आहे. यामुळे जलवाहिनी समजला जाणाºया वर्धा नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने वेकोलिने टाकलेले मातीचे ढीगारे घातक आहेत.वेकोलिने टाकलेले मातीचे महाकाय ढिगारे वेकोलिच्या कुशित बसलेल्या प्रकल्पग्रस्त गावांसाठी अतिशय घातक आहे. पावसाळ्याच्या दिवसात बॅक वॉटरचा फटका बसून या गावांना पुराचा मोठा धोका होण्याची शक्यता आहे. वेकोलि प्रशासनाने याची तातडीने उपाययोजना न केल्यास प्रकल्पग्रस्त गावातील नागरिक वेकोलिविरोधात रस्त्यावर उतरल्यिाशिवाय राहणार नाही.- भास्कर जुनघरी, नागरीक, गोवरी