शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दुहेरी हत्याकांडप्रकरणी आरोपीला जन्मठेप

By admin | Updated: May 14, 2016 00:50 IST

नात्यातील घराशेजारच्या दोन लहान मुलांचा क्रूरपणे खून करून नंतर पाण्याच्या टाक्यात बुडविण्याच्या आरोपाखाली बल्लारपुरातील सला नामक युवतीला

दोन मुलांचा केला होता खून : बल्लारपूर शहरातील घटनाचंद्रपूर : नात्यातील घराशेजारच्या दोन लहान मुलांचा क्रूरपणे खून करून नंतर पाण्याच्या टाक्यात बुडविण्याच्या आरोपाखाली बल्लारपुरातील सला नामक युवतीला शुक्रवारी चंद्रपूरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची सजा सुनावली. तब्बल पावणेतीन वर्षानंतर या घटनेचा निकाल न्यायालयाने दिला. त्यावेळी मृत मुलांच्या नातेवाईकांचे डोळे आठवणीने डबडबले.बल्लारपुरातील बालाजी वॉर्डात राहणाऱ्या सला आमनखाँ पठाण या १९ वर्षीय युवतीने आपल्या घराशेजारच्या नेहा खान (८) आणि शफाख खान (१०) या भावंडांचा निर्घृणपणे खून केल्याची घटना १३ सप्टेंबर २०१३ ला सकाळी उघकडीस आली होती. या तरूणीच्या घराशेजारी राहणारे इस्त्राईल खान अब्दूल मुस्तझा खान यांनी सलाच्या वडिलांजवळ सलाच्या वर्तणुकीबद्दल चर्चा करून तिचे लवकर लग्न करण्याचा सल्ला दिला होता. यामुळे ती ईस्त्राईल खान यांच्यावर चिडून होती. हा राग मनात ठेवून सूड उगविण्यासाठी तिने १३ सप्टेंबरला सकाळी १० वाजताच्या सुमारास या दोन्ही मुलांना एकापाठोपाठ एक आपल्या घरी बोलावून आधी त्यांना गळफास लावून ठार मारले. त्यानंतर पाण्याच्या टाक्यामध्ये दोघांनाही बुडविले. दोन्ही मुले बराच वेळ होऊनही घरी न आल्याने सलाच्या घरी जावून बघीतले असता हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर पोलिसांनी सलाला ताब्यात घेवून अटक केली होती. बल्लारपूरचे तत्कालिन पोलीस निरीक्षक पंजाबराव मडावी यांनी या घटनेचा तपास करून साक्षीपुरावे न्यायालयापुढे सादर केले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. आर. अग्रवाल यांनी या प्रकरणी सर्व साक्षीपुरावे तपासून शुक्रवारी सलाला जन्मठेपेची शिक्षा आणि २५ हजार रूपये दंडाची शिक्षा आणि दंड न भरल्यास सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. सहायक सरकारी वकील म्हणून संजय मुनघाटे यांनी काम सांभाळले. निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात गर्दी झाली होती. (जिल्हा प्रतिनिधी)