शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

नव्या पिढीने ज्येष्ठांना समजून घ्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:03 IST

नव्या पिढीने ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवातून ज्ञान मिळवावे आणि ज्येष्ठांना समजून घ्यावे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांनी केले. महायोगी श्री अरविंद सभागृहात योध्दा संन्यासी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक-मित्र मंडळाच्या वतीने स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देनामदेव उमाटे : विवेकानंद महाविद्यालयात पालक-मित्र मंडळाची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : नव्या पिढीने ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवातून ज्ञान मिळवावे आणि ज्येष्ठांना समजून घ्यावे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांनी केले.महायोगी श्री अरविंद सभागृहात योध्दा संन्यासी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक-मित्र मंडळाच्या वतीने स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम मत्ते, सचिव कौरासे, कोषाध्यक्ष मांडवकर, डॉ. पी. प्रेमचंद, रमेश खातखेडे, गुलाबराव पाकमोडे, नामपल्लीवार, पंढरी गायकवाड, चंपतराव आस्वले, अण्णाजी कुटेमाटे आदी मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. उमाटे म्हणाले, रात्रंदिवस काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करून मुलाबाळांना शिक्षण देवून मोठे केले जाते. मात्र, ज्येष्ठ नागरिकांना योग्य सन्मान मिळण्याऐवजी कुटुंबातच त्यांची उपेक्षा होते. उर्वरित आयुष्य ताणतणावात आणि आपल्या कुटुंबाच्या कल्याणाकरिताच घालवतात. मनस्ताप अनावर झालेले जेष्ठ नागरिक तर कधी आत्महत्याही करतात, हे दुर्देवी आहे. नवीपिढी अशा अनुभवी आधारस्तंभापासून वंचित होवून पोरकी होत आहे. ही चिंतेची बाब असून, ज्येष्ठ नागरिकांना समजून घेण्याची आवश्यकता आहे. सुसंवाद साधून कुटुंबात संतुलन निर्माण केल्यास सुखी जीवन जगता येते. त्यासाठीच सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, असेही प्राचार्य डॉ. उमाटे यावेळी सांगितले. याप्रसंगी जेष्ठ नागरिकांकरिता संस्थेद्वारे दर महिन्यात विविध रोगांचे तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी केली जाते. मनोरंजनासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. औषधोपयोगी विविध वनस्पतीची निर्मिती, संवर्धन व वितरण, वाचन लेखन व निर्मित साहित्याचे प्रकाशन, सर्व जातीय वधूवर संशोधन व पुनर्विवाह व सुक्ष्म व्याख्यान, योग, ध्यान व सत्संग आदी उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक व विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.