शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना दोनदा पिके घेण्यास प्रवृत्त करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:25 IST

राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करून जिल्ह्यातील शेतकºयांना वर्षातून किमान दोन वेळा पिके घेण्यासाठी प्रवृत्त करावे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत चंद्रपूरमधील रब्बी हंगामातील लागवड क्षेत्रामध्ये वाढ करण्याबाबत कृषी विभागाने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केल्या.

ठळक मुद्देआशुतोष सलिल : जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करून जिल्ह्यातील शेतकºयांना वर्षातून किमान दोन वेळा पिके घेण्यासाठी प्रवृत्त करावे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत चंद्रपूरमधील रब्बी हंगामातील लागवड क्षेत्रामध्ये वाढ करण्याबाबत कृषी विभागाने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केल्या. कृषी विभागातर्फे गुरुवारी स्थानिक नियोजन भवनात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.या बैठकीला जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अण्णासाहेब हसनाबादे यांच्यासह जिल्ह्यातील कृषी व अन्य प्रमुख विभागाच्या अधिकाºयांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये आगामी वर्षाचे नियोजन करताना उपलब्ध बियाणे, खते, पावसाची उपलब्धता, पीक कर्जाची उपलब्धता, बँकेकडून शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज, प्रधानमंत्री पीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, किसान क्रेडीट कार्ड वाटप, प्रधानमंत्री कृषी सिंचाई, केंद्रिय सिंचन योजना याशिवाय जिल्ह्यातील कापूस पेरणाऱ्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आलेल्या चोर बीटी बियाण्याच्या महत्वाच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये आगामी महिन्यात गावागावात होणाऱ्या ग्रामसभांमध्ये कृषी सहायकांनी सहभागी होऊन शेतकऱ्यांना बोंडअळीचा संभाव्य प्रादुर्भाव आणि आमिष दाखवून विकल्या जात असलेल्या चोर बीटी बियाण्याबद्दल माहिती देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.अण्णासाहेब हसनाबादे, आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर, उपविभागीय कृषी अधिकारी राजवाडे यांनी या आढावा बैठकीत जिल्ह्यातील कृषिविषयक समस्यांची मांडणी केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा पेरा कमी होत असल्याबद्दल कारणे जाणून घेतली.बोंड अळीचा प्रादुर्भाव असताना कापसाच्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विषयावर शेतकऱ्यांचे प्रबोधन मोठ्या प्रमाणात करण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले.शेतकरी कर्जापासून वंचित राहू नयेजिल्ह्यातील सर्व बँकांना पिक कर्ज वाटपासाठी निर्धारित उद्दिष्ट दिले आहे. एकाही शेतकºयाला बँकेतून निराश होऊन परत जावे लागणार नाही. याबाबत बँकांनी नियोजन करावे, शेतकऱ्यांना या हंगामासाठी आवश्यक असणारे पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देशही जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांना जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी दिले. मे महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असून या काळात शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करण्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात आवश्यक असणाºया बियाण्यांची उपलब्धता तसेच खतांची आवश्यकता याबाबतही आढावा घेण्यात आला.विविध योजनांचा आढावाया बैठकीमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये शाश्वत जलसाठे निर्माण करण्याच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली आहे. तथापि शाश्वत सिंचन वाढत असताना जिल्ह्यांमध्ये रब्बी पीक घेण्यास शेतकरी फारसे उत्सुक नसल्याचे चित्र का आहे, याबाबत चर्चा झाली. या हंगामामध्ये रब्बी पिकाच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली पाहिजे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यासाठी कृषी विभागाच्या सर्व शाखांनी एकत्रित येऊन योजनेच्या विस्तारिकरणात लक्ष वेधावे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यांमध्ये ठिंबक व सूक्ष्म सिंचन वाढविण्यात यावे. मागेल त्याला विहीर या योजनेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, अशी सूचनाही जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केली.