कोरोना संकटामुळे अद्यापही शाळा सुरू झाल्या. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहे. काही गावांमध्ये मोबाईल नेटवर्कची समस्या आहे. अशावेळी विद्यार्थी अन्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे पडू नये यासाठी भद्रावती पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या भामडेरी येथील शिक्षकांनी कुटीमध्ये नैसर्गिक वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना धडे देणे सुरु केले आहे.
------
चिल्लरच्या तुटवड्यामुळे नागरिक त्रस्त
चंद्रपूर : सध्या देवाण-घेवाणातील व्यवहारात चिल्लरचा तुटवडा असल्याने व्यावसायिकासह ग्राहक हैराण झाले आहे. किराणा दुकान, भाजीपाला, पान टपऱ्यांमध्ये नागरिकांना चिल्लरसाठी संताप व्यक्त होताना दिसत आहे. व्यवहाराच्या दृष्टीने चिल्लर पैशाचे नाणे व नोटांची गरज अत्यावश्यक आहे. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही मोठी अडचण निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातही चिल्लरचा तुटवडा निर्माण होताना दिसून येत आहे.