शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

डीटीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ

By admin | Updated: July 26, 2016 00:59 IST

मागील सात वर्षापासून शिक्षक भरती (सीईटी) परीक्षा झालेली नाही. त्यामुळे लाखो डीटीएड पदवीधारक बेरोजगार आहेत.

केवळ दोन अर्ज : अनेक जागा रिक्त राहण्याची शक्यता परिमल डोहणे  चंद्रपूरमागील सात वर्षापासून शिक्षक भरती (सीईटी) परीक्षा झालेली नाही. त्यामुळे लाखो डीटीएड पदवीधारक बेरोजगार आहेत. त्यामुळे २१ जुलैपासून सुरू झालेल्या डीटीएड आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेचे पाच दिवस उलटूनही जिल्ह्याभरात केवळ २ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज दाखल केले आहे. यावरुन डीटीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे. यावर्षी ९ जुनपासून आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र डीटीएड झाल्यानंतरही शिक्षकाची नोकरी मिळेल, याची शाश्वती नाही, असा उल्लेख करण्यात आला होता. पण काही संस्था चालकांनी या प्रवेश प्रक्रियेला न्यायालयात आव्हान दिले होते. त्यामुळे ही प्रक्रिया दोन महिने बंद होती. २१ जुलैपासून आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरु झाली असून ही प्रक्रिया १ आॅगस्टपर्यंत चालणार आहे. मात्र विद्यार्थ्यांचा डीटीएडकडे कल नसल्यामुळे पाच दिवसानंतर जिल्ह्यात फक्त दोनच आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. पुर्वी हमखास नोकरी मिळण्याचे शिक्षण म्हणून डीटीएडकडे बघीतले जायचे. डीएडला प्रवेश मिळवण्यासाठी चडाओढ असायची. तर बहुतेकजण प्रवेश मिळवण्यासाठी वारेमाप पैसे मोजायचे. त्यामुळे अनेक खाजगी कॉलेज वाढले. त्यातच मागील सात वर्षापासून सीईटीची परीक्षा झाली नाही. सन २०१० मध्ये केंद्रीय शिक्षक भरती झाली. त्यानंतर आजपर्यंत एकदाही शिक्षक भरती झाली नाही. त्यामुळे अनेक डीटीएड पदवीधारकांची बेरोजगार फौज तयार झाली. त्यामुळे आजच्या घडीला डीटीएड अभ्यासक्रमाला विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. परिणामी यावर्षी अनेक विद्यालयातील जागा रिक्त राहण्याचे चिन्ह दिसून येत आहेत.प्रथमच आॅनलाईन प्रक्रियाडीटीएड प्रवेशाची आॅनलाईन प्रक्रिया ही यावर्षी पहिल्यांदाच सुरु करण्यात आली आहे. पुर्वीच्या प्रवेश प्रक्रियेच्या प्रमाणात आॅनलाईन प्रक्रिया अधिक क्लिष्ट आहे. पुर्वी डायट कॉलेजमधून प्रवेश अर्ज घेऊन तो भरावा लागत होता. मात्र आता आॅनलाईन प्रवेश अर्ज भरायचा, त्यानंतर कागदपत्र पडताळणी करायची, मग प्रपत्र जमा करायचे, ही प्रक्रिया यावर्षीपासून पहिल्यांदाच सुरु करण्यात आली आहे. आयडीयल बॅचलाही विद्यार्थी मिळेनातजिल्हास्तरीय डायट कॉलेज म्हणजेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमध्ये ४५ विद्यार्थ्यांची एक बॅच असते. शासकीय महाविद्यालयाचे प्रवेश शुल्क ३ हजार २०० व इतर महाविद्यालयाचे शुल्क १२ हजार रुपये आहे. त्यामुळे या शासकीय कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी चढाओढ असायची. पुर्वी यामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण लागायचे. त्यामुळे या बॅचला आयडीयल बॅच असे संबोधले जायचे. मात्र आता या बॅचलासुद्धा विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. शिक्षकांची भटकंतीजिल्ह्यात विनाअनुदानीत कॉलेजच्या संस्था भरमसाठ आहेत. त्यामुळे विद्यार्थी मिळविण्यासाठी विनाअनुदानीत कॉलेजचे शिक्षक भटकंती करीत आहेत. विद्यार्थ्यांना वेगवेगळी आमीष दाखवून प्रवेश घेण्यासाठी सांगत आहेत. मात्र बेरोजगांराची वाढती संस्था पाहून अनेक विद्यार्थी डीटीएडला प्रवेश घेण्यासाठी नकार दर्शवित आहेत.