शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

शेततळे योजनकडे वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांची पाठ

By admin | Updated: July 13, 2016 02:04 IST

जमिनीची भूजल पातळी वाढावी व शेतकऱ्यांना सिंचनाची सोय शेतात व्हावी, याकरीता शासनाने ‘मागेल त्या शेतकऱ्यांना शेततळे’ ही योजना...

टार्गेट अपूर्ण : अधिकारी व कर्मचारी वैतागले वरोरा : जमिनीची भूजल पातळी वाढावी व शेतकऱ्यांना सिंचनाची सोय शेतात व्हावी, याकरीता शासनाने ‘मागेल त्या शेतकऱ्यांना शेततळे’ ही योजना युद्ध स्तरावर राबविणे सुरू केले आहे. परंतु, या योजनेत अनेक त्रुटी असल्याने शेतकऱ्यांनी तुर्तास या योजनेकडे पाठ फिरविली आहे. दिलेले शेतकऱ्यांचे टार्गेट पूर्ण होत नसल्याने अधिकारी व कर्मचारी धस्ताविले असल्याचे दिसून येत आहे. शासनाने शेततळ्याकरिता आॅनलाईन अर्ज शेतकऱ्यांकडून मागितल्याने प्रारंभी शेतकऱ्यांनी शेततळे करण्याकरिता मोठ्या प्रमाणात आॅनलाईन अर्ज कृषी खात्याकडे सादर केले. जेव्हा शेततळ्याचे लेआऊट व करारनामा करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्याकडे पोहचले, त्यावेळी त्यातील अनेक त्रुटी समोर आल्या. त्यात ३० - ३० शेततळे खोदण्याकरिता शासनाकडून अनुदान ५० हजार रुपये देण्यात येणार आहे. प्रथम शेततळे खोदा, नंतर शेतकऱ्यांना बँक खात्यात अनुदान जमा होणार असल्याची माहिती देण्यात आली. ३०- ३० मी शेततळे खोदण्याकरीता ७० ते ८० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. शेततळे खोदल्याबरोबर तात्काळ मजूर व मशीनधारकास रक्कम द्यावी लागणार. त्यामुळे आधीच नापिकीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी शेततळ्यास नकार घंटा वाजविली आहे. यासोबत शेतात शेततळे खोदल्यास तेवढी जागा व्यर्थ जाणार शेततळ्यातील पाणी पिकांना कसे द्यावे, शेतकऱ्याची दुरुस्ती व देखभाल यावर होणार दरवर्षीचा खर्च शेतकऱ्याला करावा लागणार आहे. यामध्ये अनेक त्रुटी असल्याने शेतकऱ्यांनी शेततळे शेतात खोदण्यास नकार दिल्याचे मानले जात आहे. शासनाने कृषी विभागास टार्गेट दिले आहे. परंतु सदर योजनेतील त्रुटी दूर करण्यास वरिष्ठ अधिकारी तयार नसल्याने येत्या काळात मागेल त्यांना शेततळे योजना भुईसपाट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)