शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-चंद्रपूर मार्गावरील व्हिडीओकॉन कंपनी परिसरात बिबट्याचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 20:06 IST

वरोरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या येन्सा गावाच्या शिवारात मागील काही दिवसांपासून बिबट्याने आपले बस्तान मांडले आहे.

ठळक मुद्देअनेकांना दर्शनबेवारस कुत्र्यांना केले फस्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वरोरा तालुक्यातील नागपूर-चंद्रपूर रस्त्या लगतच्या येन्सा गावाच्या शिवारात व व्हिडीओकॉन कंपनीच्या परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याने आपले बस्तान मांडले आहे. सध्या तरी या बिबट्याने मानवावर हल्ला केलेला नाही. मात्र परिसरातील कुत्र्यांना त्याने लक्ष्य केले आहे.

वरोरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या येन्सा गावाच्या शिवारात मागील काही दिवसांपासून बिबट्याने आपले बस्तान मांडले आहे. व्हिडीओकॉन कंपनीच्या परिसरात त्याचा वावर आहे. सदर बिबट चार ते पाच वर्ष वयाचा असल्याचे समजते. व्हिडीओकॉन परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे-झुडुपे आहेत. यासोबत मजरा गाव व आनंदवन परिसराच्या मागे सदर बिबट्याचा वावर असल्याची माहिती समोर आली आहे. आजपर्यंत बिबट्याला अनेक नागरिकांनी बघितले आहे. सध्या बिबट्याने कुत्रे मारणे सुरू केले असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. आता शेतामध्ये पेरणी तर काही शेतात मशागतीची कामे सुरू आहे. बिबट्याच्या या परिसरात फिरण्यामुळे शेतकरी कमालीचे धास्तावले आहेत. शेतकरी एकटा शेतात जाण्यास बिबट्याच्या भीतीने धजावत नाही. त्यामुळे शेतीच्या कामावर विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.बिबट्याचा वावर व्हीडीओकॉन कंपनी परिसरात असल्याने त्या परिसरात गस्त घालण्यात येत आहे. ट्रॅप कॅमेरे त्या परिसरात लावले आहेत.- विजय रामटेके, राऊंड ऑफीसर, वनपरिक्षेत्र वरोरा.

टॅग्स :leopardबिबट्या