वर्षा खरसान यांचे मार्गदर्शन : स्वत:च्या रक्षणासाठी महिलांनी पुढे यावेचंद्रपूर : स्थानिक जनता महाविद्यालयात महिला समुहातर्फे गुरूवारी स्त्रियामंध्ये कायदेविषयक जनजागृती व्हावी, यासाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत महिला पोलीस निरीक्षक वर्षा खरसान यांनी मार्गदर्शन केले. स्त्रियांच्या बचावासाठी व सुरक्षितेसाठी अनेक कायदे असून स्त्रिया अजूनही पुढे येण्यासाठी व अन्यायाला वाचा फोडण्याकरिता घाबरतात. पण स्वत:चा बचाव करण्यासाठी सिक्स सेन्सचा वापर करुन त्यांचा प्रतिकार करु शकतात, त्याला धडा शिकवू शकतात, असे त्या म्हणाल्या. यावेळी स्लाईड शो दाखवून घराबाहेर पडणाऱ्या स्त्रियांनी, मुलींनी स्वत:च्या बचाव करावा, असे आवाहन वर्षा खरसान यांनी केले.यावेळी संस्थेच्या अध्यक्ष प्रतिभा जीवतोडे, प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष, उपप्राचार्य कमलाकर धानोरकर, पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, महिला समूहाच्या अध्यक्ष डॉ. अनिता हुडा, प्रा. जांभुळकर, प्रा. नाहिदा बेग उपस्थित होते. डॉ. दुधपचारे, प्रा. कोन्ड्रा, डॉ. सरिता तिवारी, प्रा. मनिषा महातळे, डॉ. शितल गोमकर यांनी कार्यक्रमाला सहकार्य दिले. (स्थानिक प्रतिनिधी)
्रजनता महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृती कार्यशाळा
By admin | Updated: August 9, 2015 01:13 IST