शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

लोकसभा ना विधानसभा, सर्वात मोठी ग्रामसभा

By admin | Updated: March 10, 2015 01:08 IST

देशाला एकीकडे कृषीप्रधान म्हटले जाते व दुसरीकडे शासनच शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे.

गुरुदेवभक्तांची गर्जना : भूमि अधिग्रहणाच्या विरोधात भजन सत्याग्रहचंद्रपूर : देशाला एकीकडे कृषीप्रधान म्हटले जाते व दुसरीकडे शासनच शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे. शासन अमलात आणू पाहणारा भूमि अधिग्रहण अध्यादेश शेतकरीविरोधी आहे. यात ग्रामसभेलाच कमी लेखले आहे. या अध्यादेशाला परत घ्या, अशी मागणी करीत ‘लोकसभा ना विधानसभा, सर्वात मोठी ग्रामसभा’ अशी गर्जनाच आज सोमवारी जिल्हाभरातील गुरुदेवभक्तांनी केली.गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आज सोमवारी दुपारी १२ वाजतापासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन सत्याग्रह आयोजित करण्यात आले होते. यावेळी तुकारामदादाचे उत्तराधिकारी ल.भा. नारखेडेदादा, आचार्य वेरूळकर गुरुजी, गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा प्रमुख सेवकराम मिलमिले, सुबोधदादा, गुरुकुंज मोझरीचे रविदादा खरतडकर, विठ्ठल महाराज डाखरे, भाऊराव वैद्य, डॉ. डी.पी. जोगी, रवी इंगोले, आनंदराव डफ आदी उपस्थित होते. दुपारी १२ वाजता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन करून भजन सत्याग्रहाला सुरुवात करण्यात आली. रवी महाराज इंगोले यांनी महाराजांची एकापेक्षा एक सरस भजने गायिली. भजनाच्याच सोबतीने जनजागृती व समाज प्रबोधनही केले. त्यानंतर जिल्हाभरातून आलेल्या गुरुदेवभक्तांची रॅली काढण्यात आली. जटपुरा गेटवरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला गुरुदेवभक्तांनी पुष्पमाला अर्पण केली. त्यानंतर रॅली पुन्हा सत्याग्रहाच्या मंडपात विसर्जित करण्यात आली. यावेळी मार्गदशन करताना तुकारामदादाचे उत्तराधिकारी भुवैकुंठ आत्मानुसंधान अड्याळ टेकडीचे ल.भा. नारखेडे म्हणाले, शासनाचा हा भूमिअधिग्रहण कायदा म्हणजे लोकशाहीचा प्रत्यक्ष खूनच आहे. ग्रामसभा ही स्वयंभू, सर्वोंच्च व सार्वभौम आहे. तिच्यावर कोणी नाही, ग्रामसभेला कुणाच्या परवानगीची गरज नाही. तिच्यावर अपील नाही आणि स्टेदेखील नाही. २४ डिसेंबर १९६ ला भुरिया अ‍ॅक्टनुसार ग्रामसभा संसदेपेक्षा श्रेष्ठ ठरली आहे. असे असतानाही शासनाच्या भूमि अधिग्रहण कायद्यात ग्रामसभेच्या अधिकाराला तिलांजली दिली आहे. गुरुकुंज मोझरीचे रविदादा खडतरकर म्हणाले, शासन अमलात आणू पाहणारा भूमि अधिग्रहण अध्यादेश शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा आहे. या अध्यादेशामुळे शेतकरी मातीत मिसळून उद्योजकांची भरारी होणार आहे. भूळ अधिग्रहण कायद्यामधील १८९४ च्या अन्यायकारक तरतुदीत २०१३ मध्ये प्रथमच सुधारणा करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मूळ इंग्रजकालीन कायद्यात ११८ वर्षानंतर सुधारणा होऊन हा सुधारित भूमि अधिग्रहण कायदा सर्व संमतीने संसदेत पारित होऊन १ जानेवारी २०१४ पासून अमलात आला होता. मात्र नव्या सरकारने कायद्याच्या मुख्य गाभ्यास हात घालून शेतकरी हिताचे कलमे वगळून नवा अध्यादेश आपल्या मताप्रमाणे पारित करवून घेतला. त्यामुळे या अध्यादेशाला आमचा विरोध आहे. हा अध्यादेश परत घ्यावा, अशी आम्हा गुरुदेवभक्तांची मागणी आहे. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा प्रमुख सेवकराम मिलमिले म्हणाले, हे आंदोलन म्हणजे सुरुवात आहे. आपल्या गावांसाठी, हक्कांसाठी आणखी बरीच आंदोलने करावी लागणार आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सर्वप्रथम क्रांती केली होती. स्वार्थी राजकारणी देशाचे कसे वाटोळे करतील, हे महाराजांनी यापूर्वीच आपल्या भजनात लिहून ठेवले आहे. गावाची संपत्ती गावकऱ्यांची आहे. सरकार केवळ आपण नियुक्त केलेला रखवालदार आहे. दरम्यान दुपारी ३ वाजताच्या सुमारास गुरुदेव सेवा मंडळाच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना आपल्या मागणीचे निवेदन पाठविले. (शहर प्रतिनिधी)शेतकरी संघटनेचा पाठिंबाज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून गुरुदेव सेवा मंडळाने भजन सत्याग्रह केला. या सत्याग्रहाला शेतकरी संघटनेचे पाठिंबा दर्शविला. शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप म्हणाले, शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेत आले आहे. देशात शेतकरीविरोधी २२४ कायदे आहेत. या कायद्यामुळे शेतकरी न्यायालयात जाऊन आव्हान करू शकत नाही. देशाच्या संरक्षणासाठी जमीन जात असेल तर आमचा विरोध नाही. मात्र उद्योजकांच्या भरभराटीसाठी शेतकऱ्यांची जमीन वापरून त्यांना रस्त्यावर आणले जात असेल, तर याला आमचा कडाडून विरोध आहे. या आंदोलनात चटप यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही उपस्थित होते. काय आहे भूमी अधिग्रहण कायदा ?ग्रामसभेचे भूसंपादनाला विरोध करण्याचे अधिकार रद्दशेतकऱ्यांची जमीन घेण्यासाठी ८० टक्के शेतकऱ्यांची सहमती घेण्याची गरज नाहीशेतकऱ्यांची कोणतीही जमीन, केव्हाही सरकार ताब्यात घेणारशेताची किंमत ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्यांना राहणार नाही.अधिग्रहणासाठी सरकारला नोटीफिकेशन, जाहिरात देण्याची गरज नाही.शेतकऱ्यांची जमिनीवर उभ्या राहणाऱ्या उद्योगात शेतकऱ्याच्या मुलाला नोकरी देण्याची अट रद्दव्यासपीठावरच जाळला अध्यादेशजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या भजन सत्याग्रहादरम्यान शासनाच्या भूमि अधिग्रहण अध्यादेशाच्या प्रति व्यासपिठावरच जाळून अध्यादेशाची होळी करण्यात आली. यावेळी शेतकरीविरोधी शासनाचा निषेध करण्यात आला.