शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्र निर्मितीसाठी जातींचा त्याग करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:42 IST

समरसत्ता हा गोंडस शब्द बहुजन समाजामध्ये रूजविल्यामुळे सहिष्णूता धोक्यात आली आहे. म्हणूनच संसदीय लोकशाही सामाजिक लोकशाहीमध्ये रुपांतर होऊ शकली नाही.

ठळक मुद्देएम. टी. साव : मूल निवासी बहुजन एकजूट परिषद

ऑनलाईन लोकमतचंद्रपूर : समरसत्ता हा गोंडस शब्द बहुजन समाजामध्ये रूजविल्यामुळे सहिष्णूता धोक्यात आली आहे. म्हणूनच संसदीय लोकशाही सामाजिक लोकशाहीमध्ये रुपांतर होऊ शकली नाही. सशक्त राष्टÑाची निर्मिती झाली नाही. त्याकरिता मूलनिवासी बहुजन समाजाने जातीचा गर्व सोडावा, असे मत मूलनिवासी संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एम. टी. साव यांनी व्यक्त केले. मूल निवासी बहुजन एकजूट परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.बामसेफ जिल्हा शाखेच्या वतीने रविवारी रेडक्रॉस भवनात ही परिषद घेण्यात आली. या परिषदेचा विषय ‘समतामूलक समाज आणि सशक्त राष्ट्र निर्मितीसाठी फक्त मूलनिवासी बहुजन समाजाची एकजूट अनिवार्य आहे’ असा होता. परिषदेचे उद्घाटन तैलिक महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव फंड यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून अ‍ॅड. राजेंद्र जेनेकर, अल्पसंख्याक संघटनेचे शेख अब्दुल वहाब, सूर्यकांत झाडे, प्रसिद्ध लेखक अशोक पवार, सतीश मालेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. जातीय विभाजनाने बहुसंख्याक असलेला बहुजन समाज अल्पसंख्याक झाला. याचा गैरफायदा शोषक समाजव्यवस्था घेत आहे. धर्म संरक्षणाच्या नावाखाली जातींचा वापर करण्याचे प्रकार वाढले. त्यामुळे मूलनिवासी ही संकल्पना स्वीकारून सर्व समाजातील नागरिकांनी प्रबोधनासाठी पुढे यावे, असा सूर या परिषदेत उमटला. लोकशाहीर दादाजी वाघमारे खुशाल साव, निर्विकार खोब्रागडे यांनी स्फूर्तीगीते सादर केलीत. प्रास्ताविक के. के. शेंडे तर संचालन पंकज जांगडेकर यांनी केले. यावेळी जी. के. उपरे, सेवकदास बरके, नरेंद्र गोस्वामी, ताराचंद भसारकर, एकनाथ साव, सुभाष गेडाम आदी उपस्थित होते.