शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण मध्य रेल्वेगाड्या बल्लारशाहपर्यंत सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:27 IST

सुदर्शन निमकर यांची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडे मागणी सास्ती : कोरोना महामारी रोगामुळे दक्षिण मध्य रेल्वे विभागाने काही गाड्या फक्त ...

सुदर्शन निमकर यांची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडे मागणी

सास्ती : कोरोना महामारी रोगामुळे दक्षिण मध्य रेल्वे विभागाने काही गाड्या फक्त तेलंगणा राज्याच्या सिरपूर - कागजनगर आणि सिरपूर टाऊनपर्यंत सुरू केल्या आहेत. त्या कोरोना महामारीमुळे महाराष्ट्र राज्यात आणल्या जात नाहीत. त्या गाड्या दक्षिण मध्य रेल्वेच्या शेवटचे स्टेशन बल्लारशाहपर्यंत आणण्याची मागणी राजुराचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

दक्षिण मध्य रेल्वेची मर्यादा महाराष्ट्राच्या बल्लारशाह स्टेशनपर्यंत आहे. परंतु लॉकडाऊन काळात बल्लारशाहकडे येणाऱ्या गाड्या बंद केल्यामुळे महाराष्ट्रातील बल्लारशाह आणि जिल्हा मुख्यालय, चंद्रपूर परिसरातील प्रवाशांना अडचणी येत आहेत. हा महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय आहे. तेलंगणातील कागजनगर आणि महाराष्ट्राचा बल्लारशाह दरम्यानचा भाग हा सीमाभाग आहे. या परिसरात बहुतांश तेलगू भाषिक नागरिक राहात असून, या भागाचा मोठ्या प्रमाणात तेलंगणातील राज्यातील गावांशी जनसंपर्क असल्यामुळे दैनंदिन रहदारी मोठ्या प्रमाणात आहे. सीमा भागातील लोकांना सुविधा देण्यासाठी रेल्वेगाड्या सिकंदराबाद आणि काझीपेठ ते सिरपूर - कागजनगर ते बल्लारशाहपर्यंत वाढविल्या पाहिजेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने रेल्वे गाड्या बल्लारशाहपर्यंत पुन्हा सुरू कराव्यात आणि सिरपूर - कागजनगरपर्यंत चालणाऱ्या गाड्या बल्लारशाहपर्यंत वाढवाव्यात. याचबरोबर नागपूरहून सिकंदराबादकडे जाणारी इंटरसिटी एक्स्प्रेस माणिकगड रेल्वे स्टेशन आणि विरूर स्टेशनवर थांबत होती. परंतु ही रेल्वेगाडी रायपूर ते सिकंदराबादपर्यंत धावत असल्याने माणिकगड स्टेशन आणि विरूर स्टेशनचा थांबा बंद करण्यात आला आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांचे मोठे हाल होत असून, या रेल्वेगाडीचे थांबे देण्यासाठी नागरिक मागणी करीत आहेत. नागरिकांची ही मागणी लक्षात घेता माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या काही गाड्या बल्लारशाहपर्यंत सोडण्याच्या मागणीचे निवेदन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पाठविले आहे.