शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

यशस्वी होण्यासाठी संघर्ष करायला शिकावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 22:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : शेतकऱ्यांनी जहर खाऊन फासावर लटकून जीवन संपवू नये. शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी धाडसाने व्यवसाय करावा. ...

ठळक मुद्देज्ञानेश वाकुडकर : ‘शेतकऱ्याच्या पोरा लढायला शिक’ प्रबोधनपर कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांनी जहर खाऊन फासावर लटकून जीवन संपवू नये. शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी धाडसाने व्यवसाय करावा. कर्जाला घाबरू नये. बचतगटाच्या माध्यमातून महिलांनी लहान व्यवसाय, शेती उद्योग उभे करावे. यशस्वी होण्यासाठी संघर्ष करायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी व्यक्त केले.जगदगुरु संत तुकाराम महाराज जयंती पर्वावर धनोजे कुणबी समाज मंदिर चंद्रपूरच्या वतीने सभागृहात प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांचा नुकताच ‘शेतकऱ्याच्या पोरा लढायला शिक’ काव्य गायनाचा प्रबोधनात्मक कार्यक्रम समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.यावेळी समाज वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी ११ वर्षांपासून नित्यनेमाने सुरू असलेली प्रार्थना सादर करून संत तुकाराम महाराजांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते होते, तर उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर तर स्वागताध्यक्ष विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले होते. विचारपीठावर मंडळाचे साहित्य व सांस्कृतिक कक्ष प्रमुख प्रभाकर पारखी, सचिव अतुल देऊळकर, सल्लागार विनायकराव धोटे, उपाध्यक्ष विनोद पिंपळशेंडे तसेच इतर कार्यकारिणी सदस्य व महिला संघटन प्रमुख सविता कोट्टी उपस्थित होते.प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांच्या काव्यगायनाने उपस्थित श्रोते भारावून गेले. याप्रसंगी मनोहर पाऊणकर म्हणाले की, नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाने अनेक नवीन उपक्रम आखले आहेत. समाजाने आधुनिकतेची नवीन विचाराची कास धरावी. आपसी हेवेदावे विसरावे. महिलांनी बुरसटलेल्या रूढीपरंपरेच्या बाहेर येऊन संक्रांतीला पुस्तकाचे वाण द्यावे. म्हणजे वाचनाची आवड रुजली जाईल. अध्यक्ष अ‍ॅड. सातपुते म्हणाले, पुरुषाबरोबर महिलांनी सामाजिक कार्यात अग्रेसर असले पाहिजे तरच समाजाची प्रगती होऊ शकते. प्रत्येकाने मला समाजाचे काही देणे लागते ही भावना जोपासावी. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.प्रास्ताविक प्रभाकर पारखी यांनी केले. स्वागताध्यक्ष सुधाकर अडबाले यांनी स्वागतपर भाषण केले. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक कविवर्य बापूराव टोंगे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, सुप्रसिद्ध कवी मनोज बोबडे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन प्रा. रवी वरारकर यांनी, तर आभार विनायक धोटे यांनी मानले. कार्यक्रमासाठी समाज मंडळ कार्यकारिणी, साहित्य व सांस्कृतिक कक्षाच्या सदस्यांनी सहकार्य केले. यावेळी परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.