शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

डोंगरहळदी शिवारात पट्टेदार वाघाचे वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:08 IST

डोंगरहळदी शेतशिवारामध्ये मागील काही दिवसांपासून पट्टेदार वाघाचे सतत दर्शन होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

ठळक मुद्देधास्ती : शेतकऱ्यांनी सोडली जागली

निलकंठ नैताम।आॅनलाईन लोकमतपोंभूर्णा : डोंगरहळदी शेतशिवारामध्ये मागील काही दिवसांपासून पट्टेदार वाघाचे सतत दर्शन होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. स्थानिक गुराख्यांनी वाघाची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यामुळे जंगलात जाण्यासाठी ग्रामस्थ कचरत आहेत.पोंभूर्णा तालुक्यातील डोंगरहळदी येथील कक्ष क्र. ५२६ मध्ये घनदाट जंगल आहे. त्यामुळे पट्टेदार वाघाने या परिसरात आपले बस्तान मांडले. हा वाघ मादी प्रजातीचा असून त्याच्यासोबत छोटे दोन बछडे असल्याची माहिती गुराख्यांनी दिली. हा वाघ शिकारीसाठी शेतशिवारातील परिसरामध्ये सतत भटकत असल्याचेही गुराख्यांचे म्हणणे आहे. परिसरात वाघाचा वावर सुरू असल्याची माहिती नजिकच्या गावांमध्ये पोहोचताच ग्रामस्थ भयभित झाले आहेत. वनविभागाच्या अधिकाºयांना या घटनेची माहिती नव्हती. परंतु मागील आठवड्यात देवाडा खुर्द येथील शेतकरी रविंद्र नैताम यांची जनावरे चरण्यासाठी कक्ष क्र. ५२६ मध्ये गेले असता जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्या गाईवर झडप घेवून ठार केले. या घटनेची तक्रार शेतकºयाने वनरक्षक कावळे यांना दिली. दरम्यान, कावळे यांनी घटनास्थळाची पाहणी करून सोमवारला पंचनामा केला. यासंदर्भातील अहवाल वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. सद्य:स्थितीत या परिसरामध्ये धानपिकांची कापणी व बांधणीच्या कामाला जोमात सुरुवात झाली. रानडी डुकरांपासून शेतपिकांचे नुकसान टाळण्यासाठी जिवाची पर्वा न करता परिसरातील अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये रात्रीला मचानावर बसून जागल करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या जिविताला वाघापासून धोका निर्माण होवू शकतो.ग्रामस्थांना अभय द्यावेदेवाळा खुर्द जंगल परिसरात वाघाने गाईला ठार केल्याची घटना घडली. गुराख्यांना वाघाचे सतत दर्शन होत असल्याने ग्रामस्थांनी जंगलात जाणे बंद केले. गाय ठार झालेल्या शेतकºयास अद्याप भरपाई मिळाली नाही. त्यामुळे दहशत कायम असल्याचे दिसून येते. दरम्यान, वन विभाग आणि राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या चमुंनी या जंगलात कॅमेरे लावल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक मुकूल त्रिवेदी यांनीही दुजोरा दिला आहे.चराई वनक्षेत्रावरील अतिक्रमण हटविण्याची मागणीदेवाडा खुर्द येथील परिसरामध्ये महसूल विभागाची शेकडो एकर जागा चराईसाठी राखीव ठेवण्यात आली होती. त्यामुळे देवाडा खुर्द, डोंगरहळदी, जामतुकूम, जामखुर्द, रामपूर दीक्षित, हत्तीबोडी आदी गावांतील जनावरांच्या चाºयाची समस्या सुटली होती. मात्र, काही व्यक्तींनी या क्षेत्रावर अतिक्रमण केले. तर दुसरीकडे परिसरात वाघाचा संचार सुरू झाल्याने शेतकरी व गुराख्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. हे अतिक्रम हटविण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. अतिक्रमणापूर्वी चराईचा प्रश्न सुटला होता. परंतु सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी अधिकाºयांना हाताशी धरून चराईच्या जागेवर अतिक्रमण केले. शिवाय, केवळ पैशाच्या जोरावर बोगस पट्टे तयार करून त्या ठिकाणी धानपिकांची शेती करीत आहेत. त्यामुळे स्थानिक परिसरातील शेतकºयांना आपल्या जनावरांना चारण्यासाठी जंगल परिसराशिवाय दुसरा मार्ग नाही. त्यामुळे शेतकºयांचे एखादे जनावर दगावल्यास त्यांच्या कुटुंबावर फार मोठा आघात होतो. शेती करण्याचे साधन संपुष्टात येते. पोंभूर्णा तालुक्यात सिंचनाचे क्षेत्र अतिशय अल्प आहे. परिसरातील शेतकरी केवळ निसर्गावरच शेती करीत आहेत. पण, निसर्गाच्या लहरीपणामुळे पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन होत नाही. परिणामी, शेतकरी कर्जाचा विळख्यात सापडला. आता परिस्थितीत जनावरांच्या चराईवरही बंधने आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.डोंगरहळदी परिसरातील कक्ष क्रं. ५२६ मध्ये वाघाने एका गाईला ठार केले होते. त्यामुळे ५२६ आणि ५१६ या दोन वनकक्षांमध्ये कॅमेरे लावण्यात आले आहे. या कॅमेरामुळे कुठलीही अनुचित घटना घडणार नाही. वरिष्ठ अधिकाºयांच्या मार्गदर्शनानुसार वनविभागाकडून सहकार्य करण्यात येणार आहे.-एस. ए. वळे, वनरक्षक, डोंगरहळदी