शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यातील दहा वाळूतस्करांवर एलसीबीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 19:44 IST

पोंभुर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; अंधारी नदीच्या भिमनी घाटावरून केली जात होती तस्करी

चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक वाळूघाटातूनवाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू असल्याच्या तक्रारी पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना अवैध वाळूतस्करांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोंभुर्णा तालुक्यातील अंधारी नदीच्या भिमणी घाटावरून अवैधरित्या वाळूची तस्करी करणारे दहा वाळूचे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. यासर्व वाळूतस्करांवर गुन्हे दाखल करून ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या या कारवाईने वाळूतस्करी करणा-यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्त्वात अवैध वाळूतस्करांवर पाळत ठेवण्यासाठी पथक गठित करण्यात आले आहे. शनिवारी रात्री पोंभुर्णा तालुक्यातील अंधारी नदीच्या भिमनी घाटातून अवैधरित्या वाळूची तस्करी केली जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक खाडे यांनी भिमनी घाटावरून वाळूतस्करी करणा-यांवर कारवाई करण्याच्या सूचना आपल्या पथकाला दिल्या.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भिमणी घाटावर धडकले. यावेळी घाटातून वाळूचा उपसा करताना दहा ट्रॅक्टर आढळून आले. कागदपत्रांची तपासणी केली असता कुणाकडेही कागदपत्रे नव्हती. त्यानंतर विनय गंगाधर आलाम (वय २९, रा. फुर्डीहेटी), तुषाल रामदास पिंपपळकर (वय २२, रा. फुर्डीहेटी), सचिन वासुदेव गौरकार (वय ३०, रा. वासनकौठी), विजय श्रीनिवासी आत्राम (वय ३६, रा. भिमनी), रोशन भगिरथ नरसपुरे (वय २६, रा. वेळवा), स्वप्नील शंकर पिंपपळशेंडे (वय २७, रा. चेक ठाणेवासना), गोपीनाथ भगवान सिडाम (वय ३५, रा. चेक खापरी), पुरुषोत्तम दिलीप पिदूरकर (वय ३६, रा. मोहाडा), दीपक कातरूजी शुभ्रत्कर (वय ३०, रा. घाटकुळ), राजू काशिनाथ गोंधळी (वय ३५, रा. पोंभुर्णा) या वाळूतस्करांविरुद्ध पोंभुर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून सर्व ट्रॅक्टर जप्त करण्यात आले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलिस अधीक्षक अुतल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पोलिस उपनिरीक्षक संदीप कापडे, खनके, साळवे, भुजाडे, बल्की, गोहोकार, जांभुळे, डांगे, जमीर, मोहुर्ले यांच्या पथकाने केली.

टॅग्स :sandवाळू